ताथवडे घाटात दरडींचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST2021-06-30T04:25:15+5:302021-06-30T04:25:15+5:30

वाठार निंबाळकर : ताथवडे ता.फलटण घाटातील दरडी कोसळण्याची भीती ताथवडे ग्रामस्थ व वाहन चालक करीत आहेत, या बाबतीत सविस्तर ...

Danger of patients in Tathawade Ghat | ताथवडे घाटात दरडींचा धोका

ताथवडे घाटात दरडींचा धोका

वाठार निंबाळकर : ताथवडे ता.फलटण घाटातील दरडी कोसळण्याची भीती ताथवडे ग्रामस्थ व वाहन चालक करीत आहेत, या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, फलटण पुसेगाव रस्त्यावरील ताथवडे या सुमारे चार किलोमीटर घाट रस्त्यावर डोंगरावरून मोठमोठे दगड निसटून रस्त्यावर येत आहेत.

सध्या या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण काम अंतिम टप्प्यात आहे. रस्ता दुरुस्ती होत असल्याने, वाहन चालक व परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असले, तरी घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे, असे दगड काढून टाकण्यात यावेत, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते अरविंद जाधव म्हणाले, सध्या घाटातील रस्ता दुरुस्ती सुरू असून, या कामामध्ये घाटातील दरडी कोसळण्याची शक्यता आहे, अशा दरडी तातडीने काढण्यात याव्यात. पाऊस पडल्यानंतर अचानक मोठे दगड डोंगरावरून रस्त्यावर पडतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याबरोबरच दरडी कोसळून रस्ता वाहतूक बंद होईल. त्यामुळे प्लॅस्टर अथवा लोखंडी जाळी लावून आधीच उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

Web Title: Danger of patients in Tathawade Ghat