दहिवडीची बाजारपेठ आज उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:42+5:302021-03-08T04:36:42+5:30

दहिवडी : गेले सोळा दिवस लॉकडाऊनमुळे बंद असलेली दहिवडीची बाजारपेठ सोमवारी उघडण्याला प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक सर्व ...

Dahivadi market will open today | दहिवडीची बाजारपेठ आज उघडणार

दहिवडीची बाजारपेठ आज उघडणार

दहिवडी : गेले सोळा दिवस लॉकडाऊनमुळे बंद असलेली दहिवडीची बाजारपेठ सोमवारी उघडण्याला प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक सर्व बंधने पाळून बाजारपेठ सकाळी अकरा ते सायंकाळी चार यावेळेत उघडणार आहे. मात्र, दहिवडी शहर वगळता वाड्या-वस्त्यांवरील अनेक शेतकरी हे भाजीपाला, दूध, किराणा, मेडिकल, रासायनिक खते यासाठी बाजारात येत असतात. सध्या सुगीचे दिवस असल्याने बाजारपेठेची वेळ वाढविण्याची मागणी होत आहे.

दहिवडीतील कोरोनाचा वेग चौथ्या दिवशी मंदावला आहे. रविवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. त्यामुळे दहिवडीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी लोकांनी लाॅकडाऊन उठवले असले, तरी योग्य काळजी घ्यावी व आदेशाचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच जे नागरिक नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण कोडलकर, डाॅ. हेमंत जगदाळे, डाॅ. मयुरी शेळके, डाॅ. विनायक कुलकर्णी, डाॅ. अनिल काशीद, डाॅ. नितीन खुळे यांचे पथक यापुढेही दहिवडी शहरावर लक्ष ठेवणार आहे. त्याचबरोबर यापुढे जास्तीत जास्त लोकांना लस उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे.

चौकट

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात अचानक दहिवडी शहर ‘हाॅटस्पाॅट’ बनले होते. दहिवडीच्या व्यापाऱ्यांनी सोळा दिवस लॉकडाऊन पाळले. दहिवडीकरांनी या काळात खूप संयम पाळला. प्रशासनाला सहकार्य केले, हे कौतुकास्पद आहे.

- धनाजी जाधव,

नगराध्यक्ष, दहिवडी

Web Title: Dahivadi market will open today