शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अंमलीसाठाप्रकरणी सॅम्युअल पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 22, 2015 00:16 IST

११२ किलो २९ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) चा अंमली पदार्थांचा साठा सातारा पोलिसांनी हस्तगत केला होता.

शिरवळ : कण्हेरी, ता. कराड येथे पोलीस हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडे सापडलेल्या २२ कोटी ४० लाख ९१ हजार ९५० रुपयांच्या एम. डी. (मेफेड्रॉन) चा ११२ किलो २९ ग्रॅमच्या साठ्याप्रकरणी खंडाळा पोलिसांना या चैनमधला महत्त्वाचा दुवा ग्यान मनिक्कम सॅम्युअल (वय ४०, रा. न्यू गणेशनगर, विद्यालंकार कॉलेजजवळ, वडाळा, पूर्व मुंबई) हाती लागला आहे. याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी सॅम्युअल याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सॅम्युअल याला पोलिसांनी खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने शुक्रवार, दि. २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.खंडाळा तालुक्यातील कण्हेरी येथे मुंबई येथे पोलीस दलात असणाऱ्या धर्मराज बाबूराव काळोखे (वय ५२) याच्याकडून ११२ किलो २९ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) चा अंमली पदार्थांचा साठा सातारा पोलिसांनी हस्तगत केला होता. तर काळोखे हा कार्यरत असलेल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या त्याच्या कपाटातून १२ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी अंंमली पदार्थ तस्करीप्रकरणी धर्मराज काळोखेसह या अंमली पदार्थाची मुंबईतील तस्कर क्वीन बेबी पाटणकरसह पुरवठा केलेल्या ग्यान मनिक्कम सॅम्युअल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेबी पाटणकर ही अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. मात्र, पोलिसांच्या ताब्यात बेबी पाटणकर मोठ्या शिताफीने सापडली. दरम्यान, याप्रकरणी महत्त्वाचा दुवा असणारा सॅम्युअल हा खंडाळा पोलिसांच्या ताब्यात असल्याने अनेक खुलासे होण्याची शक्यता असून, महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करीत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांनी तपासाची गती वाढविली असून, सॅम्युअलला घेऊन अधिक तपासाकरिता पुणे येथे घेऊन गेले आहेत. दरम्यान, सॅम्युअल हा इतर राज्यांतून अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)