रस्त्यांवर भांडण करणाऱ्या तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST2021-05-19T04:40:31+5:302021-05-19T04:40:31+5:30

सातारा : कोरोना महामारीत सार्वजनिक रस्त्यावर भांडणे करणाऱ्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सादीक रज्जाक सय्यद ...

Crime on three people arguing on the streets | रस्त्यांवर भांडण करणाऱ्या तिघांवर गुन्हा

रस्त्यांवर भांडण करणाऱ्या तिघांवर गुन्हा

सातारा : कोरोना महामारीत सार्वजनिक रस्त्यावर भांडणे करणाऱ्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सादीक रज्जाक सय्यद (वय ४८), साजीद अस्लम शेख (वय ३७), अब्दुल उस्मीन मेमन (वय ३९, सर्व रा. मंगळवार पेठ, दस्तगीर कॉलनी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरील तिघे सार्वजनिक रस्त्यावर भांडत होते. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार शब्बीरखान लतीफखान मोकाशी यांनी त्यांना तुम्ही रस्त्यावर भांडणे करू नका, असे सांगितले. मात्र, त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक घोडके करत आहेत.

Web Title: Crime on three people arguing on the streets