विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:22 IST2021-03-30T04:22:59+5:302021-03-30T04:22:59+5:30

पाचगणी : पाचगणी येथील भारती विद्यापीठाच्या गाॅडस व्हॅली हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्याला व्यवस्थापक व अन्य दोघांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. ...

Crime against three including the principal in the case of beating a student | विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

पाचगणी : पाचगणी येथील भारती विद्यापीठाच्या गाॅडस व्हॅली हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्याला व्यवस्थापक व अन्य दोघांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिकेसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, एक विद्यार्थी शाळेच्या बाहेर गेला. यामुळे चिडून मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापक व अन्य दोघांकडून लाकडी बांबूच्या साहाय्याने विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याने चौघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये प्रमोद हवालदार, कुमार शिंदे, मामा बनसोडे, व मुख्याध्यापिका (सर्व रा. गॉडस व्हॅली इंटरनॅशनल गोडवली, पाचगणी.) यांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी घडली होती. तसेच मुख्याध्यापिकेच्या सांगण्यावरून तिघांनी शुक्रवार, दि. २६ रोजी पहाटे साडेबारापासून रविवार, दि. २८ रोजी सकाळी दहापर्यंत वेळोवेळी वसतिगृहाच्या खोलीत ‘हात बांधून कोंडून ठेवले’ म्हणून वगैरेची तक्रार दिली. त्यामुळे गुन्हा रजिस्टर दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रसाळ व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

दरम्यान, संबंधित शाळा व्यवस्थापनाने मुलाने केलेले आरोप खोडून टाकले आहेत.

Web Title: Crime against three including the principal in the case of beating a student