शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

दहिगाव सोसायटीत १ कोटी २५ लाखांचा भ्रष्टाचार

By admin | Updated: July 17, 2014 23:17 IST

देऊर पाठोपाठ दहिगाव सोसायटी अडचणीत

वाठार स्टेशन : कोरगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर सोसायटीत दोन कोटींची अफरातफर झाल्याची घटना ताजी असतानाच आता याच सचिवाकडे असलेल्या दहिगाव विकास सोसायटीतही जवळपास १ कोटी २५ लाखांची अफरातफर झाल्याचे उघडकीस आल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. ‘नाबार्ड’चे सलग पुरस्कार घेऊन आदर्शवादाचा डंका पिटणाऱ्या जिल्हा बँकेच्या अधिपत्याखाली चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात १० सोसायट्यांत भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या. देऊर सोसायटी व दहिगाव सोसायटी या दोन्ही सोसायट्या एकाच सचिवाच्या अधिपत्याखाली होत्या. देऊरमधील भ्रष्टाचार जाहीर होताच दहिगावमध्येही सुरुवातीला कुजबूज झाली. आता या सोसायटीच्या लेखापरीक्षण अहवालात ६५ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. यात एकूण १ कोटी २५ लाखांचा भ्रष्टाचार सचिवाने केल्याचा आरोप ठेवला आहे. यात संचालक मंडळ, जिल्हा बँक विकास अधिकारी, सचिव यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर) सभासद शेतकऱ्यांची फसवणूक करून सचिवाने खोट्या सह्या करून बँक विकास अधिकारी यांना हाताला धरून आमच्या नावे दुबार कर्जप्रकरणे केली जात आहेत. यामधील जबाबदार असणाऱ्या लेखापरीक्षकांसह जिल्हा बँक विकास अधिकारी संचालक मंडळाबबात योग्य ती कारवाई आवश्यक आहे. - सतीश चव्हाण,सभासद, दहिगाव सोसायटी