शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 17:16 IST

dam, satara, farmar मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने याचा पंचनामा केला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

ठळक मुद्देवाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेतमराठानगर गावांचा शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

मायणी : मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने याचा पंचनामा केला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, मराठानगर (गुंडेवाडी) येथील शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येरळा नदीवर २०१२ मध्ये बंधारा बांधण्यात आला होता.

पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाणी साठ्यात नसल्याने हे पाणी उन्हाळ्यामध्ये बंधाऱ्यात राहत नसल्याने गावातील ग्रामस्थांनी संबंधित लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरुन बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवून घेतली होती.गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे येरळा नदीपात्रात असलेला बंधारा १६ सप्टेंबर रोजी वाहून गेला. नदीपात्रातून सध्या पाणी वाहत असूनही बंधारा नसल्याने पाणीसाठा होत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये व येणाऱ्या उन्हाळ्यात या परिसरातील शेतीपाणी प्रश्न व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

बंधारा वाहून गेल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीही संबंधित अधिकारी या बंधाऱ्याच्या पंचनामा करण्यासाठी फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.शेकडो बागायती क्षेत्र अडचणीतयेरळा नदी पात्रात असलेल्या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र बागायत झाले आहे. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला होता. मात्र हा बंधारा वाहून गेल्याने हे दोन्ही प्रश्न गंभीर झाले आहेत.

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर