शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Coronavirus Unlock: कोरोना गो... लढ्यात जनताच आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:34 PM

कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोना गो... : लढ्यात जनताच आखाड्यातसवयभानतर्फे बंदचे आवाहन

सागर गुजरसातारा : कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यामध्ये जावळी, वाई, कोरेगाव, पुसेगाव, रहिमतपूर या परिसरामध्ये जनतेने कर्फ्यू पुकारला. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढू लागला असल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून जनता आता स्वत:हून बंद पुकारण्याच्या मानसिकतेत आहे.कोरोनाबाधितांचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेलेला आहे. शेकडो लोक आपला प्राण गमावून बसलेले आहेत. घरातील चालती-बोलती माणसे कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडत आहेत. तर कोरोनाबाधित झालेली कुटुंबे अक्षरश: तडफडताना पाहायला मिळतात.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असली तरीदेखील रुग्णालयांमधील बेडची संख्या अपुरी पडत आहे. आॅक्सिजनचे प्रमाण कमी आहे. व्हेंटिलेटर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे.

धनदांडग्यांनी काही रुग्णालयांमध्ये बेड बळकावले आहेत, त्यामुळे जे गरजवंत लोक आहेत आणि अंतिम वेळी त्यांना आॅक्सीजन, रेडमीसीवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर याची गरज पडते. ऐनवेळी हे मिळत नसल्याने देखील लोक मृत्युमुखी पडत आहेत.

हे चित्र समोर दिसत असल्याने जिल्ह्यातील नागरिक अधिकच दक्ष झाल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीत सवयभान अभियानाचे प्रवर्तक राजेंद्र चोरगे यांनी नागरिकांना लॉकडाऊनचे आवाहन करण्यात आले आहे.

शेजारच्या सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जनता कर्फ्यू सुरु असताना साताऱ्यातील प्रशासनाने आवाहन न करता देखील जनताच कर्फ्यूसाठी पुढाकार घेताना दिसते.लॉकडाऊन गरजेचाकोरोनाची साखळी तोडणं गरजेचे आहे. साताऱ्याच्या रक्षणासाठी लॉकडाऊन आवश्यक वाटते. सध्या प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, पितृपंधरवडा सुरु असल्याने व्यवसाय बंद ठेवले तर नुकसान होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे आवाहन सवयभानतर्फे केले आहे.जनतेलाच हवाय बंद..सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन सुरू असताना प्रशासनाची नजर चुकवून लोक रस्त्यावर येत होते. आता कोरोनाने कहर माजवल्याने जनताच सावधगिरीच्या तयारीत आहे, असे मत नगरसेवक धनंजय जांभळे यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यात यानंतरच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या कमी आहे. गोरगरिबांचा त्रास कमी करायचा असेल तर चेन तोडावी लागणार आहे.- राजेंद्र चोरगे

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSatara areaसातारा परिसर