शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘कन्टेम्पररी’ नृत्याविष्कार ते ‘टॉलिवूड’

By admin | Updated: January 13, 2015 00:17 IST

लाइव्ह स्टेज शो : पंकज चव्हाण अ‍ॅकॅडमीच्या नृत्यप्रकारांनी सातारकरांना धरायला लावला ठेका

सातारा : ‘मोरया-मोरया’पासून ‘रेशमाच्या रेघांनी’पर्यंत आणि ‘कन्टेम्पररी’ आकृतिबंधांपासून थेट ‘टॉलिवूड’पर्यंत... एकसे एक धमाकेदार परफॉर्मन्स. उसळतं संगीत आणि त्यावर सातारकरांच्या पावलांनी धरलेला ठेका. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली नृत्यरजनी रंगतच गेली.. रात्री पावणेअकरापर्यंत! पंकज चव्हाण अ‍ॅकॅडमीच्या डान्स वर्कशॉपमध्ये सिद्धेश पैने मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘लाइव्ह स्टेज शो’ शाहू कलामंदिरात रंगला. क्षणाक्षणाला हसविणाऱ्या डी. महेश यांच्या निवेदनाने तो आणखी खुलला. प्रारंभी स्वप्नील आणि अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना गायिली. नंतर ‘मोरया मोरया’ हा नृत्याविष्कार झाला. नंतर ‘इंडियावाले’ गाण्यावर थिरकणाऱ्या बालचमूला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘रेशमाच्या रेघांनी’ लावणीने ‘वन्समोअर’ घेतला. ‘मला वेड लागले’ गाण्यावर कन्टेम्पररी नृत्याविष्कार सादर झाला. अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या ‘मम्मींच्या, ‘मनवा लागे’ आणि ‘तितली बन के दिल उडा’ या नृत्यांना प्रेक्षकांनी टाळ््यांच्या गजरात दाद दिली. मेहेरबाँ, जुम्मे की रात, धतिंग नाच यांसारख्या एकसे बढकर एक गाण्यांवर नृत्ये सादर झाली. ‘जय मल्हार’ मालिकेच्या शीर्षकगीतावरील नृत्याला विशेष प्रतिसाद लाभला. पंकज चव्हाण यांनी डोळे बांधून सादर केलेल्या कन्टेम्पररी नृत्याला प्रेक्षकांनी उभे राहून प्रतिसाद दिला. शेवटी ‘डीआयडी’फेम सिद्धेश पैने सादर केलेल्या नृत्यावर प्रेक्षक फिदा झाले. (प्रतिनिधी)

मान्यवरांची उपस्थिती
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नटराजाचे पूजन करण्यात आले. बँक आॅफ महाराष्ट्रचे केदार स्वामी, थोरात, हॉटेल राधिका पॅलेसचे दीपक पाटील, अ‍ॅम्बिशन क्लासच्या रूबी, दिलीप येळगावकर, विशाल ढाणे, सुमित साठे, सारंग गुजर, प्रदीप चव्हाण, नितीन दीक्षित, समृद्धी जाधव, राजू घुले, पोदारचे प्राचार्य साहू, निर्मला कॉन्व्हेन्टच्या मिला ग्रीन, अरुण गोडबोले, सिद्धेश पै, पंकज चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.