पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणाचे ‘कनेक्शन’ कऱ्हाडपर्यंत!

By संजय पाटील | Published: January 11, 2024 08:49 PM2024-01-11T20:49:57+5:302024-01-11T20:50:22+5:30

पिस्तुल पुरविले : कऱ्हाडचा संशयीत हा रेकॉर्डवरील आरोपी

'Connection' of the Sharad Mohol murder case in Pune to Karhad! | पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणाचे ‘कनेक्शन’ कऱ्हाडपर्यंत!

पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणाचे ‘कनेक्शन’ कऱ्हाडपर्यंत!

कऱ्हाड : पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणात कºहाडच्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केले आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. धनंजय मारुती वटकर (रा. कऱ्हाड) असे पुणेपोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

पुण्यातील शरद मोहोळ याचा कोथरूड भागात भरदिवसा खून झाला होता. या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कऱ्हाडपर्यंत पोहचले आहेत. शरद मोहोळ याचा तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके रवाना केली होती. या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली. या गुन्ह्यात दोन वकीलांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. यामधे मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कऱ्हाडचा असल्याचे समोर आले.

पुणे पोलिसांनी कऱ्हाडातील धनंजय वटकर या आरोपीला ताब्यात घेवून अटक केले आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने काही महत्वाची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. धनंजय वाटकर याच्यावर कऱ्हाडातही यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च २०२३ मध्ये तब्बल चौदा पिस्तुलांसह दहाजणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात वटकर याचा सहभाग होता. पोलिसांनी त्यालाही अटक केले होते. त्या गुन्ह्यामध्ये वटकरला जामिन मिळाला होता. जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनात हल्लेखोरांना पिस्तुल पुरविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

Web Title: 'Connection' of the Sharad Mohol murder case in Pune to Karhad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.