शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रस-शिवसेनेला मिळू शकतो सत्तेचा वाटा-: महाशिवआघाडी झाल्यास राष्ट्रवादी घेऊ शकते सोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 10:10 IST

शिवसेनेचे मालोजी भोसले हे एकमेव सदस्य असून, काँग्रेसचे आण्णासाहेब निकम आणि शुभांगी काकडे हे दोन सदस्य कºहाड उत्तर मतदारसंघातील आहेत. त्यांनी अद्याप आपली नवीन राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ठळक मुद्दे कोरेगाव पंचायत समिती

साहिल शहाकोरेगाव : कोरेगाव पंचायत समितीवर राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असून दहापैकी सात सदस्य हे राष्टÑवादीचे आहेत. काँग्रेसकडे दोन तर शिवसेनेचा एक सदस्य असून, सभापतीपदासह उपसभापतीपदही राष्टÑवादीकडेच आहे. राज्यातील बदलत्या सत्ताकरणाचा कोरेगावात कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. आगामी काळात सभापती-उपसभापती निवडीवेळी धोरणात्मक निर्णय झाल्यास काँग्रेस-शिवसेनेला सत्तेत वाटा मिळू शकणार आहे.

कोरेगाव तालुका हा सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात तर कोरेगाव, फलटण (राखीव) व कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. ज्या-त्या मतदारसंघात येणाºया जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची उमेदवारी तेथील आमदारांनी निश्चित केल्याने, राष्टÑवादीमध्ये समन्वय आहे. आजवर शशिकांत शिंंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचा कारभार चालत आला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील हे सदस्य निवडीबरोबरच पदाधिकारी निवडीत समन्वय साधत असल्याने आजवर पंचायत समितीवर राष्टÑवादीचा झेंडा कायम आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंंदे यांना पराभव पत्कारावा लागला असून, शिवसेनेचे महेश शिंंदे हे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे मालोजी भोसले हे एकमेव सदस्य असून, काँग्रेसचे आण्णासाहेब निकम आणि शुभांगी काकडे हे दोन सदस्य कºहाड उत्तर मतदारसंघातील आहेत. त्यांनी अद्याप आपली नवीन राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आगामी काळात राज्यात शिवसेना-राष्टÑवादी -काँग्रेस अशी महाशिव आघाडी झाली तरी कोरेगाव पंचायत समितीच्या कामकाजावर कोणताही परिणाम सध्या तरी शक्य नाही.सभापतीपदांसाठीची आरक्षण सोडत अद्याप नाहीविद्यमान सभापती राजाभाऊ जगदाळे व उपसभापती संजय साळुंखे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपला असून, राज्य शासनाने अद्याप सभापतीपदासाठीची आरक्षण सोडत काढलेली नाही, तसेच सध्याच्या पदाधिकाºयांना मुदतवाढ दिली होती. राज्यात आता राष्टÑपती राजवट असून, राज्यपाल सभापती निवडीबाबत निर्णय घेण्याची शक्यता नसल्याने सध्याच्या पदाधिकाºयांना पुढील निर्णय होईपर्यंत कामकाज पहावे लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण