शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 10:23 IST

Rain Satara Highway ः मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोढपले. रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूरात डिमार्ट परिसरात पुणे- बेंगलोर महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

ठळक मुद्देएकाच रात्रीत मुसळधार पावसाचा धुमाकुळ गोटे व मलकापूरात पुणे- बेंगलोर महामार्गावर पाणी, वाहतुक विस्कळीत

मलकापूर ःमलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोढपले. रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूरात डिमार्ट परिसरात पुणे- बेंगलोर महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. एकाच रात्रीत मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे आनेक ठिकाणी उपमार्गा जलमय झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर आनेक शेतात पावसाचे पाणी घूसून महामार्गालगतच्या शेतांचे नुकसान झाले आहे.मलकापूर परिसरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी दुपारनंतर तीन वाजण्याच्या सुमारास अचानक सगळीकडे ढग दाटून आल्याने दिवस मावळल्यासारखे वातावरण झाले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक कांही क्षणातच ढगफुटीसदृष्य जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे ११ तास पडलेल्या पावसामुळे मलकापूपूरातील सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे नुकसान झाले आहे.

रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आगाशिव डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचा प्रवाह कोयना वसाहतसह विठ्ठलदेव सोसायटीतसह डिमार्ट परिसरातून उपमार्गावरून महामार्गावर शिरले. कोयनावसाहत गेट ते एन पी मोटर परिसरात उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

आगाशिवनगरात झोपडपट्टीसह दत्त शिवम् कॉलनीतील कांही घरात रस्त्यांवरील पाण्याचा प्रवाह पुन्हा घुसला. आगाशिव डोंगरावरून अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे आगाशिवनगरात देवकर वस्ती ते पवार वस्ती परिसरात दुसऱ्या दिवशीही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. तर ११ तास जोरदार पावसाने झोडपल्याने उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामूळे दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते. उपमार्गासह कराड-ढेबेवाडी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोडपले. रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूरात डिमार्ट परिसरात पुणे- बेंगलोर महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Rainपाऊसhighwayमहामार्गSatara areaसातारा परिसर