अभिनेत्रीच्या खूनप्रकरणी जवळच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:39 IST2021-01-20T04:39:24+5:302021-01-20T04:39:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विविध मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांच्या खूनप्रकरणी पोलीस आता ...

Close to the murder of the actress | अभिनेत्रीच्या खूनप्रकरणी जवळच्या

अभिनेत्रीच्या खूनप्रकरणी जवळच्या

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : विविध मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांच्या खूनप्रकरणी पोलीस आता जवळचे नातेवाईक आणि लोकांकडे कसून चौकशी करीत आहेत, तसेच पोलिसांनी दोन पथकेही कार्यरत केली आहेत.

सातारा शहराजवळील कृष्णानगर येथील गजानन हौसिंग सोसायटीमधील बंगल्यात अभिनेत्री जया पाटील या एकट्याच राहत होत्या. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून अज्ञाताने खून केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे. आता या खुनातील मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत, तसेच पाटील यांचे जवळचे नातेवाईक व लोकांकडे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पोलिसांची दोन पथकेही अज्ञात आरोपींच्या शोधात आहेत. त्यामुळे लवकरच पाटील यांच्या खुन्याला पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

.....................................................

Web Title: Close to the murder of the actress