Satara: कोरेगावात यात्रेत डीजे, बॅनर लावण्यावरून धुमश्चक्री; चौदाजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:21 IST2025-05-19T12:21:00+5:302025-05-19T12:21:57+5:30

परस्परविरोधी फिर्यादी 

Clashes over Placing Banners, DJ in Yatra in Koregaon satara, A case has been registered against fourteen persons | Satara: कोरेगावात यात्रेत डीजे, बॅनर लावण्यावरून धुमश्चक्री; चौदाजणांवर गुन्हा दाखल

संग्रहित छाया

कऱ्हाड : गावच्या यात्रेवेळी डीजे आणि फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. कोरेगाव-कार्वे (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दोन्ही गटांतील चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अक्षय अरुण सावंत याने दिलेल्या फिर्यादीवरून, सूरज दळवी, ओंकार सावंत, सिद्धार्थ पाटील, ओमसाई सावंत, शंभू सावंत, ऋषिकेश सावंत (सर्व, रा. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गावच्या यात्रेवेळी शाळेजवळ बॅनर लावण्याच्या कारणावरून संशयितांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे अक्षय सावंत हे जखमी झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार कांबळे तपास करीत आहेत.

सूरज विलास दळवी यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश ऊर्फ अक्षय अरुण सावंत, पंकज सावंत, उदय सावंत, अरुण सावंत, अविनाश सावंत, भानुदास सावंत, जालिंदर सावंत यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेत डीजे लावायचा नाही असे का म्हणतोयस, असे म्हणून संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संशयितांनी सूरज दळवी याच्यासह त्याची आत्या व मामालाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार बैले तपास करीत आहेत.

Web Title: Clashes over Placing Banners, DJ in Yatra in Koregaon satara, A case has been registered against fourteen persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.