शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शौचालयांना चकाकी

By admin | Updated: December 1, 2015 00:19 IST

दानशूर सातारकरांचे सहकार्य : ‘कर्तव्य’ने केले होते आवाहन

सातारा : कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या पुढाकाराने व्हिजन सातारा टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी आणि काही दानशूर लोकांच्या मदतीने शहरातील दुरवस्था झालेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवार पेठेतील होलार वस्ती येथील १६ सीटच्या शौचालयाच्या दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले असून, या शौचालयाच्या इमारतीने कात टाकल्याची समाधानकारक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. वेदांतिकाराजे भोसले यांनी मंगळवार पेठेतील होलार वस्ती येथे भेट दिली असता नागरिकांनी स्वच्छतागृहाबाबतच्या समस्या त्यांना सांगितल्या होत्या. शौचालयाचे दरवाजे तुटले असून, लाईट व पाण्याची व्यवस्था नसल्याचे नागरिकांनी सांगितले. हिच परिस्थिती शहरातील अनेक भागात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वेदांतिकाराजे भोसले यांनी शहरातील दानशूर लोकांनी सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला व्हिजन टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी सातारा आणि काही दानशूर लोकांनी प्रतिसाद दिल्यानंतर वेदांतिकाराजे भोसले यांच्या पुढाकाराने शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला. ‘व्हिजन’ चे सदस्य राजेश माने यांनी स्वखर्चाने होलार वस्तीतील १६ सीटर शौचालय दुरुस्तीचे काम केले. त्यांनी या शौचालयाला नवीन दारे बसवले असून, नवीन भांडी, फरशी, टाईल्स, प्लास्टर तसेच दारांच्या चौकटीही बदलल्या. (प्रतिनिधी)