शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुटींच्या सहलींनी चाफळ परिसर गजबजला

By admin | Updated: May 19, 2015 00:33 IST

राममंदिर देवस्थानने तयार केलेली ‘प्रकटले श्रीराम चाफळी’ ही चित्रफीत पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.

चाफळ : शाळा, महाविद्यालयांना मे महिन्याची सुटी लागल्याने चाफळचे राममंदिर, शिवसमर्थ स्मारक, रामघळ परिसर भाविक व पर्यटकांनी गजबजून गेला आहे. चाफळ हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथील आल्हाददायक नैसर्गिक परिसरामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सध्या शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी असल्याने अनेक निसर्गप्रेमी आपली उपस्थिती लावत आहेत. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी तीव्र उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी पणजी, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, विजयदुर्ग तसेच परदेशी पर्यटकही याठिकाणी गर्दी करू लागले आहेत. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी लागल्यानंतर साधारणपणे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून दोन महिने येथे उन्हाळी हंगाम असतो. या कालावधीत पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक दुकानदार शीतपयांची विक्री सुरू करतात. इतर वस्तूंचेही स्टॉल असून, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे स्टॉलधारक समाधानी आहेत. सध्या चाफळला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला असून, भरीव निधीतून मंदिर परिसरात विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत. येथील चोख व्यवस्थापनामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राममंदिर देवस्थानने तयार केलेली ‘प्रकटले श्रीराम चाफळी’ ही चित्रफीत पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. राम दर्शनाबरोबरच येणार पर्यटक कुबडीतीर्थ, शिवसमर्थ स्मारक, तानाजी मालुसरे सभागृह, खडीचा मारुती, रामघळ, उत्तरमांड प्रकल्प या स्थळांनाही आवर्जून भेट देत आहेत. भविक, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, देवस्थान ट्रस्टच्या वतीने ११ खोल्या व एक प्रशस्त हॉल असे सर्व सुविधांनियुक्त भक्तनिवास बांधण्यात आले आहे. याचाही लाभ भाविकांसाठी होत आहे. एकंदरीत उन्हाळी सुट्या लागल्याने उन्हाळी सहलींनी राममंदिर परिसर गजबजून गेला आहे.(वार्ताहर)