शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनाही आस स्वच्छ कृष्णामाईची !

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

वाई : शाळकरी मुलांच्या चित्रकला - निबंध स्पर्धांना तुडुंब प्रतिसाद --लोकमत इनिशिएटिव्ह

वाई : स्वच्छतेचे दूत म्हणून कितीही मोठे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर राष्ट्रीय स्तरावर उतरले असले तरी वाईतील बच्चे कंपनीने या सर्वांवर कढी केली आहे. स्वच्छतेचे महत्त्व कुंचल्यातून आणि लेखणीतून व्यक्त करत त्यांनी कृष्णामाई प्रती आपली आस्था प्रदर्शित केली.देशात नदी स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छतेचे अभियान मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे़ देशाच्या नद्या व नैसर्गिक जलस्त्रोत हे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत़ त्यामुळे याचा दुष्परिणाम पर्यावरणावर व मानवी जीवनावर होत आहे़ नद्या या जीवनदायिनी असून, त्या प्रदूषणापासून वाचाव्यात यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे, हा दृष्टिकोन समारे ठेवून ‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’ अभियान हे तालुक्यातील स्वच्छ वाहते कृष्णामाई मंच मार्फत हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत आज (शुक्रवारी) वाई तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, तसेच पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक कार्य करण्याची वृत्ती अंगी निर्माण व्हावी, व या संदर्भातील विद्यार्थ्यांचे विचार, कल्पना, मनातील भावना चित्र व निंबध रूपाने प्रगटित झाल्या.यामध्ये तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील वीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मंचच्या वतीने विविध शाळांना आज स्पर्धेनिमित्त भेटी दिल्या. स्पर्धामधील विविध गटांतून प्रथम पाच क्रंमाकांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना, शाळांना लवकरच याचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे़ याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना शाळेमार्फत देण्यात येईल अशी माहिती मंचचे वीरेंद्र जमदाडे, अनिल सपकाळ, दिलीप जाधव, राजू गायकवाड, भवरलाल ओसवाल, डॉ़ विद्याधर घोटवडेकर, संजय धेडे यांनी दिली़ (प्रतिनिधी)स्वच्छ वाहते कृष्णामाई मंचच्या वतीने सुरू केलेले अभियान हे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे बाळकडू लहान वयातच देईल व स्वच्छ भारत अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी हाईल़ - योगेश परचुरे, प्राचार्य ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, वाई