शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

साताऱ्यात चंदन तस्करी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 5:39 PM

सातारा : येथील सैनिक स्कूलच्या आवारातील चंदनाच्या झाडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, पोलिसांनी ...

ठळक मुद्देसाताऱ्यात चंदन तस्करी करणारी टोळी गजाआडतिघांना अटक: १० हजार रुपयांचा ऐवज जप्त

सातारा : येथील सैनिक स्कूलच्या आवारातील चंदनाच्या झाडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.सुनील संजय काळे, महेश बाळू बाबर (वय ३६), लक्ष्मण उर्फ बापू कुंदन भोरे (वय ३५, सर्व रा. आकाशवाणी केंद्राजवळ, नामदेववाडी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी सैनिक स्कूलच्या आवारामध्ये चंदनाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

या झाडांची गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चोरी होत होती. चार-पाच महिन्यांतून एकदा तरी या ठिकाणी चोरीचा प्रकार घडत होता. मात्र, चंदनाच्या झाडांची नेमके कोण चोरी करत आहे, हे समोर येत नव्हते. दरम्यान, चंदनाच्या झाडांची विक्री करण्यासाठी संशयित सुनील काळे हा सातारा फलटण रस्त्यावरील पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना खास खबऱ्यामार्फत मिळाली.त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला शनिवारी सायंकाळी तेथे तत्काळ पाठविले. त्यावेळी पोलिसांनी सुनील काळेसोबत असलेल्या महेश आणि लक्ष्मण या दोघांनाही तेथे अटक केली. पोत्यामध्ये ठेवलेले चंदनाचे तुकडे या तिघांकडून पोलिसांनी जप्त केले. सैनिक स्कूल समोरील चंदनाच्या झाडांची चोरी हे तिघे नेहमी करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.शहर पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आणखी कुठे त्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का? याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.या कारवाईमध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, हवालदार सुधीर बनकर, तानाजी माने, मुबीण मुलाणी, संतोष पवार, शरद बेबले, विजय कांबळे, नीलेश काटकर, प्रवीण फडतरे यांनी भाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर