शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

By admin | Updated: July 19, 2015 00:40 IST

सर्वत्र सामुदायिक नमाजपठण : दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी केली प्रार्थना

सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी रमजान ईद (ईद-उल फितर) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सातारा, कऱ्हाड, फलटण, शिरवळ, खंडाळा, धावडवाडी, कण्हेरी, वाई, महाबळेश्वर, खटाव, माण, म्हसवड, वडूज, कोरेगाव आदी ठिकाणी मुस्लीम बांधवांनी मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर नमाजपठण केले. यानंतर एकमेकांना अलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या एक आठवड्यापासून बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. ईदच्या पूर्वसंध्येला दूध, सुका मेवा तसेच कपड्यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती. चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. शनिवारी रमजान ईद असल्यामुळे विविध ठिकाणी असणाऱ्या मशिदींमध्ये व ईदगाह मैदानावर वेळेनुसार नमाजपठण करण्यात आले. यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्या दिल्या. सातारा शहरात शनिवारी दिवसभर सर्वधर्मीय नागरिकांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्या दिल्या. तसेच मनाचा गोडवा वाढविणाऱ्या शिरखुर्माचा आस्वादही घेतला. काही ठिकाणी पावसामुळे ईदगाह मैदानाऐवजी मशिदींमध्ये नमाजपठण करण्यात आले. (प्रतिनिधी) सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव रमजान ईदच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारेही देण्यात आल्या. प्रत्यक्ष भेट होऊ न शकल्याने अनेक मुस्लीम बांधवांनी एकमेकांना फेसबुक तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश पाठवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड देखील लावण्यात आले होते.