शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

वाईच्या चौकात आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’

By admin | Updated: November 6, 2014 00:02 IST

बारा कॅमरे : गुन्हेगारीला बसणार जरब

वाई : वाई शहरामध्ये मुख्य रस्त्यावर सुरक्षिततेच्या कारणासाठी बारा सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस यंत्रणेद्वारे बसविण्यात आल्याने या शहरात ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर राहणार आहे. यामुळे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे. यामुळे आता रहदारीवर नजर राहून गुन्हेगारीला जरब बसून गुन्हेगारीला आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या दशकात वाई शहराची झपाट्याने वाढ झाली आहे. वाई शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, या शहरातून पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना जाणारा मुख्य रस्ता आहे. वाई शहरालगत औद्योगिक वसाहत आहे. या सर्व गोष्टींमुळे वाई शहरात राहण्यासाठी घर घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक तसेच मुंबई-पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी गृहनिर्माण वसाहतींची निर्मिती केल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. कामानिमित्त व राहण्यासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढती गुन्हेगारीची समस्या सर्वत्र असून, या शहरात पर्यटनासाठी राज्यातून तसेच देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक येत असतात. यामुळे शहराच्या सुरक्षा यंत्रणावरील बोजा वाढला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या अत्याधुनिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्ते व शहरातील मुख्य किसन वीर चौक, मुख्य रस्ते अशा मुख्य बारा ठिकाणी पोलीस यंत्रणेद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेला गैरप्रकार तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बँका, मोठ-मोठे व्यावसायिक, सामाजिक काम करणारी मंडळे यांनी आपल्या चौकात तसेच गल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सामाजिक दायित्व पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे.- रमेश गलांडे, पोलीस निरीक्षक, वाई