धावत्या एसटीमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:00 PM2019-11-04T14:00:05+5:302019-11-04T14:01:44+5:30

महामार्गावरून भरधाव असलेल्या एसटीच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुभाजक तोडून एसटी विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी,ता. सातारा येथे झाला.

A bus driver suffered a heart attack in a running ST | धावत्या एसटीमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटका

धावत्या एसटीमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटका

Next
ठळक मुद्देधावत्या एसटीमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटकाखिंडवाडी येथील घटना : दोनजण गंभीर जखमी

सातारा/शेंद्रे : महामार्गावरून भरधाव असलेल्या एसटीच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुभाजक तोडून एसटी विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी,ता. सातारा येथे झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईहून कऱ्हाडकडे जाणारी एसटी बस (एमएच २० बीएल ३६६७) सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी परिसरात आली. यावेळी चालक विकास मारूती पवार (वय ३९, रा. तळमावले, ता. पाटण) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. एसटीचा वेग जास्त असल्यामुळे दुभाजक तोडून एसटी विरूध्द लेनवर गेली.

या लेनवरून येणाऱ्या दुचाकीला एसटीने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडीत धडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. बऱ्याच प्रवाशांच्या डोक्याला आणि हाता-पायाला जखम झाली.

एसटीतून प्रवासी खाली उतरल्यानंतर चालक विकास पवार हे स्टेअरिंगवरच बेशुद्ध असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रवासी व काही नागरिकांनी तत्काळ एसटी चालक पवार आणि जखमी प्रवासी अमित आत्माराम मोतमकर (वय ३२, रा. गजानन रेसिडेन्सी, फुटका तलाव सातारा) यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तर एसटीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दाम्पत्याला शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नावे पोलिसांना समजू शकली नाहीत. शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली नव्हती.
 

Web Title: A bus driver suffered a heart attack in a running ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.