गोळीबारप्रकरणी बंटी जाधव पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST2021-03-27T04:41:20+5:302021-03-27T04:41:20+5:30

वाई : वाई येथील रविवार पेठ, पेटकर कॉलनी येथील अभिजीत लोखंडे याच्या घरासमोर टोळी युद्धाच्या वर्चस्वातून लाठ्या- काठ्यांसह मारामारी ...

Bunty Jadhav in police custody | गोळीबारप्रकरणी बंटी जाधव पोलिसांच्या ताब्यात

गोळीबारप्रकरणी बंटी जाधव पोलिसांच्या ताब्यात

वाई : वाई येथील रविवार पेठ, पेटकर कॉलनी येथील अभिजीत लोखंडे याच्या घरासमोर टोळी युद्धाच्या वर्चस्वातून लाठ्या- काठ्यांसह मारामारी व गोळीबारप्रकरणी शुक्रवारी फरारी असलेला अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) याला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना १३ मे २०२० रोजी रात्री रविवार पेठ, पेटकर कॉलनी येथे घडली होती.

अभिजीत लोखंडे यांच्या घरासमोर वाई - मांढरदेव रस्त्यावर अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव व सोन्या मोरे (रा. गंगापुरी) यांनी सहकाऱ्यांसह मोटारीतून येऊन लाठ्या-काठ्यांनी मारामारी करून गोळीबार केला होता. यामध्ये काहीजण जखमी झाले होते. टोळी युद्धातील वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार झाला होता. यावेळी दहशत माजविण्याचा उद्देशाने गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासात इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. बंटी जाधव हा फरार होता. त्याला वाई पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता, त्याची ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: Bunty Jadhav in police custody