शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाड्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST

कोपर्डे हवेली : कऱ्हाड ते मसूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. सध्या कारखाने सुरू आहेत. या मार्गावरून ...

कोपर्डे हवेली : कऱ्हाड ते मसूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. सध्या कारखाने सुरू आहेत. या मार्गावरून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांची संख्या जास्त असून एकापाठोपाठ अनेक बैलगाड्या जात असल्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडी निर्माण होत आहे.

हातगाड्यांना दंड

कऱ्हाड : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी पालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दोन हातगाडे चालकांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. कारवाईची ही मोहिम अधिक तिव्र करणे गरजेचे आहे.

उपमार्गावर पार्किंग (फोटो : ११इन्फोबॉक्स०२)

कऱ्हाड : मलकापूरमध्ये सेवा रस्त्यावर मनमानीपणे मालट्रक तसेच दुरुस्तीस आलेली वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळेच सेवा रस्ता पार्किंग झोन बनल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उपमार्गावर वाहने पार्क करणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे.

वेलींचा विळखा

तांबवे : विजेच्या खांबांसह काही ठिकाणी तारांवरही झाडवेली वाढल्या आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन एखाद्याला जीव गमवावा लागेल, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरील प्रवाहित तारेपर्यंत हे वेल गेले आहेत. त्याचा धक्का बसून एखाद्याचा जीव जाण्याचा धोकाही त्यामुळे निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे हे वेल मोठया प्रमाणात वाढले आहेत.