शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडीलाही लागणार आता ब्रेक!

By admin | Updated: August 14, 2015 00:08 IST

जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ : ५१६ शाळांचा सहभाग; विज्ञानप्रदर्शनात वीज बचतीवर प्रात्यक्षिके, कऱ्हाडात अवतरली विज्ञान पंढरी

कऱ्हाड : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या खजिन्याची परिपूर्ण माहिती असलेले ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कऱ्हाडकरांसाठी पर्वणीच ठरले आहे. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळे तसेच प्रकल्प प्रतिकृतींच्या माध्यमातून विज्ञान युगातील माहिती प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना मिळत आहे. पर्यावरण, वीजबचत, ड्रेनेज सिस्टीम, हवा प्रदूषण रोखण्यासाठी एक्झीटफॅन तसेच मुंबई येथील मोनो रेल्वेप्रमाणे स्कायबस अशा प्रतिकृतींच्या सादरीकरणातून विज्ञान युगाचा साक्षात्कार या प्रदर्शनातून होत असल्याने कऱ्हाडला विज्ञान पंढरीचे स्वरूप अवतरले आहे. दरम्यान, प्रदर्शनात विठामाता विद्यालयाच्या वतीने अधुनिक बैलगाडी तयार करण्यात आली होती. या बैलगाडीच्या चाकांना ब्रेक आहे. विज्ञान व तंत्रज्ञानविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी. या हेतूने येथील विठामाता विद्यालय व शिवाजी विद्यालयामध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले. तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण ५१६ शाळांनी विविध प्रकारच्या उपकरणांची मांडणी केली. तसेच तंत्रज्ञानाविषयी प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती देण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले. पवनचक्की, शेंगाफोडणी यंत्र, चुंबकीय मिरची कुट्टी डंक, घरगुती कुलर, जागतिक वीज चोरीवर उपाय, ऊर्जा बचत प्रकल्प, वृक्ष पुनर्रोपण यंत्र, पुराची सूचना देणारे उपकरण, सौरऊर्जेवर चालणारा मिरची डंक, सौरऊर्जेवर चालणारी स्वयंचलित सायकल, सुरक्षित कांदा साठवण गृह, हवा शुद्धीकरण यंत्र अशा उपकरणांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण या विज्ञान प्रदर्शनातून केले गेले. तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माण, खटाव, पाटण, कऱ्हाड तालुक्यांतील ५१६ शाळांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनात खटाव तालुक्यातील विसापूर येथील संत गुंडोजीबाबा विद्यालयाने झोक्याच्या साह्याने वीजनिर्मिती केली जाऊ शकते, हे उपकरणाच्या साह्याने दाखवून दिले. प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी, इंधनाची बचत करणे या उद्देशाने कऱ्हाड तालुक्यातील शिरगाव येथील स्वातंत्र्यसैनिक गजाननराव पाटील विद्यानिकेतन विद्यालयातर्फे सादर केलेली वीजनिर्मितीवर आधारित स्वयंचलित सायकल ही प्रदर्शनाची आकर्षण ठरली. तर वाढत्या लोकसंख्येमुळे दळणवळणाच्या यंत्रणेवर याचा परिणाम होऊ लागल्याने तो टाळण्यासाठी मुंबई येथील मोनो रेल्वेप्रमाणे स्काय बस ही तयार करता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिक सादर केले. विज्ञानाच्या साह्याने भविष्यकाळातील स्वप्ने ही पूर्णत्वास येऊ शकतात, असे सांगत विठामाता विद्यालय व शिवाजी विद्यालयात भरविण्यात आलेल्या ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी याचे दर्शन घडवून दिले. सुमारे पंधरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. (प्रतिनिधी) सौरऊर्जेवर चालणारी स्वयंचलित सायकल इंधनाची बचत करण्याच्या उद्देशाने तसेच प्रदूषणमुक्त पर्यावरण करण्यासाठी पर्यायी उपाय म्हणून सौरऊर्जेवर चालणारी स्वयंचलित सायकल ही प्रदर्शनाची खास आकर्षण ठरली. सायकल, बॅटरी, स्वीच, डी. सी. मोटार, सायकलचे गिअर, लोखंडी पट्ट्या, स्क्रू, सौरऊर्जेचे पॅनेल व चेनव्हील या साहित्याच्या माध्यमातून सायकल तयार केली होती. बैलगाडीलाही लागणार ‘ब्रेक’ ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ विज्ञान प्रदर्शनात विठामाता विद्यालयाच्या वतीने ‘सुलभ वाहतूक उसाची, सुटका निष्पाप जिवाची’ हा संदेश देत बैलांचा त्रास वाचविण्याच्या उद्देशाने आधुनिक बैलगाडी तयार केली आहे. मुख्याध्यापिका शोभा पाटील, विज्ञान शिक्षिका विश्रांती देसाई, मनीषा गोरे, सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टायर, लोखंडी सांगाडा, पुढील दोन चाकांना ब्रेक अशी या गाडीची रचना असून चार हजार ७०० रुपये इतक्या अत्यल्प खर्चात ही बैलगाडी तयार करण्यात आली आहे. वीज चोरीबाबत माहिती देणारे यंत्र... वीज चोरी झाल्यास त्याची तत्काळ माहिती मिळण्यासाठी इलेक्ट्रिक सिस्टीमच्या साह्याने संपूर्ण गावाला अथवा घराला अलार्म बसवून ती वीज चोरीची माहिती मिळवता येऊ शकते, असे यंत्र कऱ्हाड येथील यशवंत हायस्कूलमधील नववीत शिक्षण घेत असलेल्या मोहनिश सुतार या विद्यार्थ्यांने सादर केले.