महाप्रसादाच्या खर्चातून बांधला पूल

By Admin | Updated: October 31, 2015 00:10 IST2015-10-30T23:33:52+5:302015-10-31T00:10:19+5:30

वडोली निळेश्वर : चाळीस हजार खर्च; नवरात्रोत्सव मंडळ, ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी

The bridge constructed from the expense of Mahaprashad | महाप्रसादाच्या खर्चातून बांधला पूल

महाप्रसादाच्या खर्चातून बांधला पूल

शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेली
वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांनी आपल्या मंडळाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर चाळीस हजार रुपये खर्च करून पूल बांधला आहे. युवकांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व ग्रामस्थांनी कौतुकही केले.
नवरात्र उत्सवाच्या काळात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत अनेक उपक्रम सर्वत्र राबविले गेले. मात्र, गावासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उभारावी या हेतूने उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या फारच कमी पहावयास मिळते. गावाच्या विकासासाठी वडोली निळेश्वर येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांक डून गेल्या २३ वर्षापासून दुर्गादेवीचा उत्सव साजला केला जातो. यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत असल्याचे लक्षात घेऊन गावातील युवकांनी ओढ्यातून वाया जाणारे पाणी अडवून ठेवण्यासाठी ओढ्यावर बंधारा बांधला. गावातील सटवाईदेवी मंदिरालगत पूल उभारण्याचा निर्णय युवकांनी घेतला व पूल बांधला.
दरवर्षी या मंडळाकडून ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादासाठी वीस ते चाळीस हजार रुपये इतका खर्च येतो. यावर्षी महाप्रसाद रद्द करून गावासाठी कायमस्वरूपी पूल असावा, असा निर्णय युवकांनी घेतला व त्याला ग्रामस्थांनी मंजुरी दिली. त्यानंतर महाप्रसादाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर पूल बांधण्यात आला.

Web Title: The bridge constructed from the expense of Mahaprashad