शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

सातारा  : हातावर बाटली फोडून युवकाची आत्महत्या, आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 4:09 PM

आजाराला कंटाळून युवकाने हातावर काचेची बाटली फोडून तसेच काचेने नस कापून घेऊन आत्महत्या केली. येथील बसस्थानकानजीकच्या मैदानात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देकऱ्हाडात बसस्थानकानजीक संपवले जीवनसहा महिन्यांपूर्वी त्याला क्षयरोग असल्याचे निदान घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत

कऱ्हाड : आजाराला कंटाळून युवकाने हातावर काचेची बाटली फोडून तसेच काचेने नस कापून घेऊन आत्महत्या केली. येथील बसस्थानकानजीकच्या मैदानात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.अशोक चंद्रकांत पवार-गुरव (वय ३६, रा. कऱ्हाड , मूळ रा. सोनवडे, संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनवडेतील अशोक पवार हा युवक गत काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कऱ्हाडमध्ये आला होता.

गतवर्षी तो शहरातील मुख्य टपाल कार्यालयानजीक असलेल्या हॉटेल वैष्णवीमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याला क्षयरोग असल्याचे निदान झाले. त्यातच तो हॉटेल वैष्णवीमधून काम सोडून निघून गेला. शनिवारी तो पुन्हा हॉटेल वैष्णवीमध्ये आला. त्यावेळी त्याची प्रकृती आणखीनच बिघडली होती.

हॉटेलमालक वसंत देवाडिगा यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तसेच याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांनाही दिली. गत दोन दिवस अशोक हॉटेल वैष्णवीमध्येच राहण्यास होता. सोमवारी हॉटेल मालकांकडून काही पैसे घेऊन तो गावी जातो, असे सांगून निघून गेला.दरम्यान, बुधवारी पहाटे त्याने बसस्थानकानजीक असलेल्या रिकाम्या मैदानात हातावर काचेची रिकामी बाटली फोडून तसेच काचेने हाताची शीर कापून घेऊन त्याने आत्महत्या केली.

दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाPoliceपोलिस