पाचगणी : महाबळेश्वर आगाराची एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने गटारात कलंडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.याबाबत माहीती अशी की,महाबळेश्वर-वाई-महाबळेश्वर ही महाबळेश्वर आगाराची बस (एमएच १२ ईएफ ६७२५) वाईहून साडेचार वाजता सुटणारी गाडी शुक्रवार, दि. १७ रोजी पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळच्या वळणावर आली. त्यावेळी गाडीची बे्रक पाईप निकामी झाल्याने धोकादायक स्थिती निर्माण आली. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यावर प्रसांगवधान राखून गाडी डावीकडील बाजूच्या गटारात उतरवली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घाटामध्येच ब्रेक निकामी झाल्याने प्रवाशांत घबराहट निर्माण होवू नये म्हणून चालकाने प्रसंगावधान दाखविले. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}