बोरगाव पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:43+5:302021-03-20T04:38:43+5:30

नागठाणे : धोंडेवाडी ता. सातारा येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी ...

Borgaon police raids gambling den | बोरगाव पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा

बोरगाव पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा

नागठाणे : धोंडेवाडी ता. सातारा येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडेवाडी येथील मारुती मंदिराच्या पारावर काही व्यक्ती तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. त्यानुसार सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हवालदार बाबा महाडिक, राहुल भोये, प्रशांत मोरे, बादशाह नदाफ व गायकवाड यांनी तेथे छापा टाकला.

यावेळी गोरख गणपत घाडगे (वय ५२), समाधान नारायण घाडगे (४२), शहाजी उद्धव घाडगे (४१), विलास यशवंत शिंदे (५८), संजय मारुती शिंदे (४८), सुभाष अनिल घाडगे (४०, सर्व रा. धोंडेवाडी, ता. सातारा), नाथाजी भानुदास पवार (३७, रा. वर्णे, ता. सातारा), सुरेश बाबाजी भुजबळ (६८, रा. अंगापूर, ता. सातारा) यांना तीनपानी जुगार खेळत असताना तेथून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून ५ हजार ३९० रुपये रोख, ३ दुचाकी व ४ मोबाईल असा सुमारे १ लाख १६ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Borgaon police raids gambling den