शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात तरुणाचा खून

By admin | Updated: August 13, 2015 22:59 IST

पूर्ववैमनस्यातून हल्ला : थरारनाट्यामुळे नागरिकांत भीती

मलकापूर : मलकापूर, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दूध डेअरीसमोर एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. संबंधिताला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अचानक झालेल्या या घटनेमुळे मलकापूरसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरेश पांडुरंग जाधव (वय ३४, रा. काटपान मळा, कापील, ता. कऱ्हाड) असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जाधव हे पत्नी व मुलासह काटपान मळा येथे राहतात. (पान १ वरून) त्यांचा मुलगा सूरज हा पाचवीमध्ये शिकत असून, तो एका खासगी शिकवणीसाठी दररोज मलकापूर येथे येत असतो.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरेश जाधव हे मुलाला शिकवणीवरून घरी घेऊन जाण्यासाठी दुचाकीवरुन मलकापूर येथे पोहोचले. त्याला घेऊन जाण्यासाठी ते दुचाकीवर बसणार एवढ्यात झाडाच्या बाजूला दबा धरून बसलेल्या दोन व्यक्तींनी तेथे येऊन सुरेश जाधव यांच्यावर झडप घातली. त्याचबरोबर धारदार शस्त्राने सुरेश जाधव यांच्यावर दोन वार केले. ते वार जाधव यांच्या मानेवर व डोक्यावर वर्मी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान, शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक हणमंत काकंडकी, यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. पोलीस कर्मचारी व नागरिकांनी उपचारासाठी जाधव यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्र्यंत घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)--चिमुरड्यादेखत वडिलांचा खून सुरेश जाधव यांचा मुलगा सागर मलकापूर येथे तो इंग्लिश स्पिकिंगचे धडे एका खासगी शिकवणीत घेतो. त्याला दररोज वडील घरी घेऊन जाण्यासाठी येतात. आजही वडील मुलाला घेऊन जाण्यासाठी आले खरे; पण चिमुरड्यादेखत वडिलांचा खून झाला आणि त्या दोघांची कायमची ताटातूट झाली. त्यावेळी चिमुरड्याने फोडलेला हंबरडा साऱ्यांचे हृदय हेलावून टाकत होता. हल्लेखोरांना मुलाने ओळखले वडिलांवर हल्ला करणारे ते दोन संशयित त्यांच्याच गावातील असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी जेव्हा मुलाकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने संबंधितांची नावे सांगितल्याचे समजते. त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.