शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भुर्इंजच्या व्हर्टिगो स्ट्रॉबेरीची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ

By admin | Updated: November 28, 2015 00:21 IST

नऊ गुंठ्यांच्या जागेत चार हजार सातशे पंचवीस थर्मोकोल पॉटचा वापर करून स्वीट चार्ली, फेस्टिव्हल, नाबिला व अ‍ेलबिआॅन जातीच्या एकोणीस हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड

भुईज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर व्हर्टिगो पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनास प्रारंभ झाला आहे. या स्ट्रॉबेरीचा विक्रीप्रारंभ महाबळेश्वर तालुका फळे-फुले आणि भाजीपाला खरेदीविक्री संस्थेचे अध्यक्ष किसन भिलारे यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी कारखाना भेटीस आलेल्या नेदरलॅँड येथील परदेशी पाहुण्यांनीही या स्ट्रॉबेरीची गोडी चाखली.पारंपरिक स्ट्रॉबेरी लागवडीला फाटा देत महाबळेश्वर येथील महाबळेश्वर तालुका फळे-फुले आणि भाजीपाला खरेदीविक्री संस्थेचे अध्यक्ष किसनराव भिलारे यांनी चार वर्षांपूर्वी व्हर्टिगो पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांना दिशा दिलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही अशा पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करता यावी, यासाठी कारखाना व्यवस्थापनाने कार्यस्थळावरील साखर भवनाच्या दक्षिण बाजूस नऊ गुंठे क्षेत्रामध्ये दोन महिन्यांपूर्वी व्हर्टिगो पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून हा प्रयोग केलेला आहे. नऊ गुंठ्यांच्या जागेत चार हजार सातशे पंचवीस थर्मोकोल पॉटचा वापर करून स्वीट चार्ली, फेस्टिव्हल, नाबिला व अ‍ेलबिआॅन जातीच्या एकोणीस हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. दोन महिन्यांनंतर प्रत्यक्षात स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झालेले असून, त्याच्या विक्रीचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, प्रकाश पवार, राहुल घाडगे, कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, शिवराज भोसले, भोसले, नेदरलँडच्या स्टिव्हीयाचे रार्जर वाँट, कॅरल वाँट, किज फनदे लुदंत, किरण मोरे, बालाजी अचवले, जे. के. पाटील, तारीक बागवान, शेखर भोसले-पाटील, सुनील शिवथरे, संतोष ढाणे, शंकर पवार, मोहन पवार, अच्युत पवार, श्रीकांत साबळे, राजेंद्र पवार, ज्ञानदेव पवार, अंकुश पवार, विजय पवार, रवींद्र पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)