शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामाकडून भावजयीचा खून

By admin | Updated: July 19, 2014 00:40 IST

कोरेगाव तालुका : जळगाव येथे गोठ्यात धारा काढताना सशस्त्र हल्ला

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार करून भावजयीचा खून करण्यात आला. याप्रकरणी दीर प्रताप शंकर जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील जाधव हे संत तुकारामनगर (पिंंपरी-चिंचवड, पुणे) येथे भाड्याने रिक्षा घेऊन चालवितात. त्यांचे मोठे भाऊ अशोक यांच्याकडे ते वास्तव्यास आहेत. जळगाव येथील शेती बघत ते जाऊन-येऊन पुण्यात व्यवसाय करतात. सध्या शेतातील कामे सुरू असल्याने ते गावीच होते. सुनीलचा भाऊ प्रताप हा कोणतेही कामङ्कनसल्यामुळे गावी राहण्यास होता. तो सतत दारूपिऊन सुनील यांची पत्नी बेबी ऊर्फराणी आणि आई अनुसया यांना शिवीगाळ करत असत. त्याच्या सततच्या भांडणाला घरातील लोक कंटाळले होते. दिराच्या वागण्याला कंटाळून राणी व त्यांच्या दोन्ही मुलींनी प्रतापला ‘घरात घेऊ नका,’ असे सुनील यांना बजावले होते. मात्र, भाऊ असल्याने सुनील यांनी पत्नीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले होते. शेतातील फुलकोबी तोडून सुनील हे गुरुवारी सकाळी सातारा येथे विकण्यासाठी गेले होते. प्रताप सायंकाळी शेतातून वैरण घेऊन घरी आला आणि गोठ्याकडे गेला होता. सायंकाळी सुनील घरी पतरले आणि चुलते संभाजी जाधव यांच्या घरी गप्पा मारत बसले होते. पत्नी राणी शेतातील कामे उरकून गोठ्यात जनावरांच्या धारा काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मुली घरात अभ्यास करत होत्या. बराचवेळ झाला तरी आई न आल्याने मुलगी चैत्राली ही गोठ्याकडे गेली. तेथे आई दिसली नाही; मात्र चुलते प्रताप हे पळून जात असल्याचे दिसले. त्यानंतर घाबरतच ती वडील सुनील यांच्याकडे जाऊन याची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण गोठ्यात गेले असता, राणी (वय ३६) बेशुध्द पडलेल्या दिसल्या. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने कोरेगावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे जाधव कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुनील यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रकाश धस तपास करत आहेत. (प्रतिनिधी) हातातल्या शस्त्राला कंटाळून पत्नी, मुलेही दूर वास्तव्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंदिरात झोपलेल्या प्रताप जाधवला ताब्यात घेतले. रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर त्याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. प्रतापला दारूचे व्यसन असून, तो कामधंदा करत नाही. त्याचबरोबर त्याला सतत धारदार शस्त्र जवळ बाळगण्याची सवय असल्याने त्याची पत्नी व मुले प्रतापला सोडून माहेरी नवी मुंबईत वास्तव्यास आहेत.