शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे उपोषण मागे

By admin | Updated: August 19, 2014 23:42 IST

पोलिसांच्या नोटिसांची होळी : मुर्दाड सरकारला हिसका दाखवू : शेट्टी

कऱ्हाड : ऊसाला दुसरा हप्ता पाचशे रूपये मिळावा व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मंगळवारी सातव्या दिवशी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, मनोज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर सात दिवस उपोषण सुरू होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवानंद पाटील, बापूसाहेब साळुंखे, प्रदीप मोहिते, सचिन नलवडे, भाऊसाहेब माने हे उपोषणास बसले होते. उपोषणादरम्यान तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेतली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. सरकार किंवा त्यांचे प्रतिनिधी दखल घेत नाहीत म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. ती मान्य करीत उपोषणकर्त्यांनी मंगळवारी उपोषण मागे घेतले. खासदार शेट्टी मंगळवारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देण्यात आले. यावेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘सात दिवसांत एकाही लोकप्रतिनिधीने उपोषणकर्त्यांची दखल घेऊ नये, ही खेदाची बाब आहे; पण काळजी करू नका. काही दिवसांतच हे लोक मते मागायला तुमच्या दारात येतील. तेव्हा त्यांना दारातसुद्धा उभे करू नका. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुर्दाड सरकारला स्वाभिमानी शेतकरी हिसका दाखवेल. शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे पाप या सरकारने केले आहे. आपण रास्त मार्गाने गुन्हे मागे घ्या, अशी विनंती करतोय. पण त्यांना आमची भाषा समजत नसेल तर हे सरकार उलथवून आपल्या वेदना समजणारे सरकारच सत्तेवर आणावे.’ (प्रतिनिधी) दक्षिण-उत्तरवर स्वाभिमानीचाच दावा कऱ्हाड दक्षिण उत्तर दोन्ही मतदार संघ महायुतीत स्वाभिमानीने मागीतले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी आवर्जून सांगितले. पण विनायक मेटेंनीही उत्तरची मागणी केली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ‘आमचं दोघांचं काय करायच ते ठरलयं,’ असं सुचक वक्तव्य त्यांनी केले. तहसील कार्यालयासमोर नोटिसांची होळी स्वाभीमानीने आंदोलन तीव्र करण्याचे जाहिर केल्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या होत्या. त्याचा निषेध म्हणून खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर त्या नोटीसांची होळी करून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.