शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

वरकुटे मलवडीत तीन ठिकाणी घरफोडी

By admin | Updated: November 7, 2015 23:38 IST

घबराटीचे वातावरण : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे शुक्रवारी रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीस गेली आहे. दरम्यान, या घरफोड्यांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वरकुटे मलवडी येथील जगतापवस्तीवर मल्हारी जगताप यांच्या घरात चोरी झाली. दरवाजाचे कुलूप काढून सोन्याची बोरमाळ, अंगठ्या, झुबे, फुले, पैंजण तसेच दोन हजारांची रोकड असा हजारोंचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. तसेच तेथे असणाऱ्या अंगणवाडीच्या इमारतीतही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कागदपत्रे विस्कटण्यात आली. त्यानंतर हायस्कूल परिसरातील शामराव अण्णा सरतापे यांच्या घराशेजारील बंद खोलीचे कुलूप कटावणीने तोडण्यात आले. चोरट्यांनी आतील पत्र्याच्या पेटीतील सोन्याची झुबे, फुले, बदाम, मनगट्या, पैंजण आणि सात हजारांची रोखड लंपास केली. त्याचबरोबरच तेथून जवळ असणाऱ्या बजरंग आटपाडकर यांच्या घरातूनही एक मोबाइल व बॅटरी चोरून नेण्यात आली. शनिवारी सकाळी म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, हवालदार बबन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद झाला नव्हता. (वार्ताहर) दागिन्यांच्या पावत्यानंतर तक्रार... पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणची पाहणी केली. पण, याबद्दल रात्रीपर्यंत तक्रार देण्यात आलेली नव्हती. चोरीस गेलेल्या दागिन्यांच्या खरेदीची पावती घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला यावे लागेल. त्या पावत्या आम्हाला न्यायालयात दाखवाव्या लागतात, असे पोलिसांनी सांगितले होते. तसेच आता चोरी झाली आहेच. वरून पोलिसांच्या चौकशीचा त्रास नको म्हणून आम्ही तक्रार दिली नाही, असे चोरी झालेल्या मल्हारी जगताप, अप्पा सरतापे यांनी सांगितले.