शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा शाडूचा... जास्तीत जास्त पाच फुटांचा!

By admin | Updated: May 22, 2015 00:21 IST

पालिकेत आज बैठक : गेल्या वर्षी अडीच हजार घरांत आली मातीची मूर्ती; यावर्षी वाढणार आकडा

सातारा : तळ्यांचे प्रदूषण, रासायनिक रंगांमुळे उद््भवणारे धोके, आरोग्यावरील दुष्परिणाम, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा लाभलेला वारसा या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ‘लोकमत’ने शाडूच्या गणेशमूर्तींसाठी सुरू केलेल्या मोहिमेस भरघोस प्रतिसाद लाभला. प्रबोधनाचा, समंजसपणाचा हाच कित्ता गिरविण्यास सातारकर यावर्षीही उत्सुक आहेत. पालिकेने तब्बल सव्वाशे दिवस आधीच मूर्तिकार, स्टॉलधारकांची बैठक शुक्रवारी बोलाविली असून, गणेश मंडळांमध्येही विवेकी विचार वाढत असल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षी मंगळवार तळ्याच्या प्रदूषणामुळे झालेल्या दुष्परिणामांपासून ‘लोकमत’ने मोहिमेचा श्रीगणेशा केला. ‘चला... बाप्पांचं पावित्र्य जपूया’ या शीर्षकाने जनमानसात रुजलेल्या या खऱ्याखुऱ्या चळवळीने खूपच सकारात्मक परिणाम नोंदविले. तब्बल अडीच हजार घरांमध्ये शाडूच्या मूर्ती आल्या. पालिकेने शाडूमूर्ती विकणाऱ्यांना खास सवलती देऊन प्रोत्साहित केले. कर्तव्य सोशल ग्रुप, मंगळवार तळे मित्र मंडळ आणि गणपती ट्रस्ट यांसारख्या सामाजिक संस्थाही हिरीरीने चळवळीत उतरल्या. घरच्या घरी विसर्जन करणाऱ्यांची संख्या शेकडोंमध्ये पोहोचली. यावर्षी साडेचार महिने आधीच मूर्तिकारांची बैठक बोलावून पालिकेने कर्तव्यदक्षता आणि प्रदूषणमुक्तीसाठीची तळमळ दाखवून दिली. गेल्या वर्षीपासून बदलत असलेली लोकभावनाच याच्या मुळाशी आहे.नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘महागणपती’ची मूर्ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय गेल्या वर्षी सम्राट मंडळाने घेतला. अजिंक्य गणेश मंडळासारखी अनेक मंडळे पूर्वीपासूनच कायमस्वरूपी मूर्ती ठेवतात, तर काही मंडळे यावर्षीपासून हा पर्याय निवडणार आहेत. मुंबईत महाकाय मूर्तींच्या विसर्जनासाठी समुद्र उपलब्ध आहे. पुण्यासह अनेक शहरांत तशी व्यवस्था नसल्याने कायमस्वरूपी मूर्तींचाच पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर, साताऱ्याचे पर्यावरणीय वेगळेपण, पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने असलेले महत्त्व ओळखून उत्सवाची आखणी आवश्यक असल्याचे मत शेकडो सातारकरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. अनेक मंडळे पाच फुटांपेक्षा लहान गणेशमूर्तींचा पर्याय यंदा निवडणार आहेत. (प्रतिनिधी)‘लोकमत’ यंदाही राहणार सक्रियप्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिका, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांशी समन्वय राखून यावर्षीही ‘लोकमत’ सक्रिय राहणार आहे. एकत्रित येऊन शाडूच्या मूर्तींची मागणी करणारे नागरिकांचे गट, कायमस्वरूपी गणेशमूर्ती ठेवण्याचा, पाच फुटांपेक्षा कमी उंचीची मूर्ती करण्याचा निर्णय घेणारी मंडळे, प्रबोधनासाठी रिंगणात उतरणाऱ्या सामाजिक संस्थांचे योगदान या सर्व प्रयत्नांच्या विस्तृत वार्तांकनाबरोबरच सक्रिय सामजिक हस्तक्षेपाद्वारे ही मोहीम अधिकाधिक रुजावी यासाठी ‘लोकमत’ प्रयत्न करणार आहे.कुंभार व्यावसायिकांना आवाहनशुक्रवारी (दि. २२) पालिकेत होणाऱ्या बैठकीत कुंभार व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून, बैठकीस कुंभार व्यावसायिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. त्याबाबत कुंभार व्यावसायिक आणि संबंधित घटकांना पालिकेने बैठकीचे पत्र दिले आहे. बैठकीत गणेशमूर्तीची उंची, विसर्जनासाठी तलाव व्यवस्था, निर्माल्य, प्रदूषण या महत्त्वाच्या बाबींवर विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.