बँक ग्राहकांना योग्य सन्मान, सेवा देईल : घोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:39 IST2021-03-05T04:39:01+5:302021-03-05T04:39:01+5:30

वडूज : ‘स्टेट बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला योग्य सन्मान व समाधानकारक सेवा दिली जाईल,’ असे आश्वासन स्टेट बँक वडूजचे ...

The bank will give due respect and service to the customers: Horses | बँक ग्राहकांना योग्य सन्मान, सेवा देईल : घोडके

बँक ग्राहकांना योग्य सन्मान, सेवा देईल : घोडके

वडूज : ‘स्टेट बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला योग्य सन्मान व समाधानकारक सेवा दिली जाईल,’ असे आश्वासन स्टेट बँक वडूजचे व्यवस्थापक कल्पेश घोडके यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

ग्राहक पंचायतीच्या वतीने ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निवेदन जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी, तालुकाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी, संघटक विनोद लोहार, सचिव, बाचाराम साबळे, राकेश सोनटक्के यांनी दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी बँकेत ग्राहक सेवा मार्गदर्शन केले जाईल. एकाच ठिकाणी सर्व सेवा दिल्या जातील, स्टाफला याबाबत सूचना दिल्या जातील व सौजन्याची वागणूक दिली जाईल. ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल, असे सांगितले.

यावेळी ग्राहक पंचायतीचे मुन्ना मुल्ला, नीलेश कणसे व ग्राहक उपस्थित होते.

Web Title: The bank will give due respect and service to the customers: Horses