शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या सुनेने अमेरिकेत गायला बालशिवाजीचा पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST

उंब्रज : छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर सातासमुद्रापारही हा सोहळा तेवढ्याच उत्साहात साजरा ...

उंब्रज : छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर सातासमुद्रापारही हा सोहळा तेवढ्याच उत्साहात साजरा होतो. अमेरिकेतील शिवप्रेमींनीही शिवजयंती यंदा कोरोनामुळे ऑनलाईन साजरी केली आणि त्यामध्ये अमेरिकेत राहणाऱ्या सातारच्या सूनबाईंनी चक्क बालशिवाजीचा पाळणा सादर करून सर्वांना सुखद धक्का दिला.

अमेरिकेत गेल्या आठ वर्षांपासून छत्रपती फाऊंडेशनच्यावतीने न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर व भारतीय दुतावासात शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मूळच्या सातारा जिल्ह्यातील उंब्रजनजीकच्या धनकवडी गावातील डॉ. संगीता तोडमल-इंगुळकर या सहभागी झाल्या. त्यांनी या कार्यक्रमात बालशिवाजीचा पाळणा नऊवारी साडी व मराठमोठा साज करून मराठी ठसक्यात सादर केला. तेथे उणे दहा तापमान असताना मराठमोळया वेशभूषेत कार्यक्रमाचे सादरीकरण करणे ही कसोटी होती; मात्र, तरीही संगीता तोडमल यांनी पाळणा सादर केला. त्यामुळे त्या सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्या.

डॉ. संगीता तोडमल-इंगुळकर या अमेरिकेतील केंटकी राज्यात राहतात. त्या पर्यावरण अभ्यासक म्हणून काम करतात. त्याचबरोबर मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य जपण्याचाही प्रयत्न करत असतात. पाळणा म्हणण्याबरोबर त्या लग्नाची हळद दळतानाची जात्यावरची गाणी, भारुड, भजन, गवळणही उत्तमपणे गातात. त्यांचे पती नीलेश इंगुळकर हे इंजिनिअर आहेत. तेही उत्तम पखवाजवादक आहेत. ही जोडी अमेरिकेत मराठी संस्कृती जपण्याचे काम कायम पुढे होऊन करत असते.

या शिवजयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक स्वप्नील खेडेकर यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी न्यूयॉर्क स्टेट सिनेटर केव्हिन थॉमस व अमेरिकेतील २५ राज्यांमधील ३५० पेक्षा जास्त छत्रपती फाऊंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते. तसेच भारत, दुबई, सिंगापूर, जर्मनी व ब्राझील देशांतून शिवप्रेमी सहभागी झाले.

- चौकट (फोटो : २०संगीता तोडमल)

मी लहानपणापासूनच ग्रामीण भागात राहिल्यामुळे ग्रामीण संस्कृतीबद्दलचे माझे नाते खूप जिव्हाळ्याचे आहे. घरात एकत्रित कुटुंबात असताना घरामध्ये बाळाचं बारसं करताना पाळणे गायले जायचे. मी ते लहानपणापासून ऐकायचे. त्यामुळे ते सर्व पाळणे, लोकगीत, भजन, गवळणी, भारुड हे तोंडपाठ आहे. शिवराय हे जागतिक कीर्तीचे महान राजे होते.

- डॉ. संगीता तोडमल-इंगुळकर