शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अतुल भोसलेंना ‘कमळ’ खुणावतंय !

By admin | Updated: September 11, 2014 23:18 IST

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ : वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे ज्येष्ठांची चुळबूळ; पण युवा मोर्चाचा उघड पाठिंबा

कऱ्हाड : गत काही महिने ‘कोणता झेंडा घेऊ हाती,’ अशा द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या डॉ़ अतुल भोसलेंना कमळ खुणवायला लागलंय़ त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं पक्षातील काही ज्येष्ठ अस्वस्थ झाले. त्यांनी एका पत्रकार परिषदेत आपली अस्वस्थताही व्यक्त केली; पण भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच भोसलेंच्या उमेदवारीची मागणी केल्याने भोसलेंच्या हातात कमळ केव्हा दिसणार? याचीच उत्सुकता साऱ्यांना लागली आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड दक्षिणमधून उभे राहण्याचा मानस डॉ़ अतुल भोसलेंचा आहे़ त्यासाठी गत दोन वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत़ सुरुवातीला ते काँग्रेसमधून लढतील, असे वाटत होते; पण आता त्यांनी महायुतीत सहभागी व्हावे अन् कऱ्हाड दक्षिणची जागा ज्या पक्षाकडे जाईल, त्या पक्षाच्या चिन्हावर लढावे, असा सूर आहे़ दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून चार हात दूरच राहणाऱ्या अतुल भोसलेंनी काँग्रेस पक्षाकडे साधी उमेदवारीही मागितलेली नाही; पण निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे़ साहजिकच मोदी लाटेवर स्वार होऊन त्यांनी भाजपात प्रवेश करावा, असा आग्रह वाढत आहे़ अतुल भोसलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होताच तालुक्यातील काही जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांनी अगोदरच त्याला विरोध करीत भावना व्यक्त केली; पण दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अतुल भोसलेंची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीचीच चक्क मागणी केली आहे़ त्यामुळे भोसलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे़ अतुल भोसलेंच्या उमेदवारीची मागणी करणारा युवकवर्ग आहे़ आज राष्ट्राचे भविष्य युवकांच्याच हातात आहे़ भाजपच्या ज्येष्ठांकडून आजवर पश्चिम महाराष्ट्रात प्रभावीपणे पक्ष वाढलेला दिसत नाही़ आज मोदी लाटेत तरुणांच्या नवसंकल्पांना वाव दिला तर पक्ष वाढू शकतो, असंच कदाचित या तरुणांना वाटत असावे; पण त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणारे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला बाधा येऊ नये म्हणून तर हा विरोध करत नसतील ना ? याचीही जोरदार चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)