शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ग्रामपंचायत बैठकीत वादातून सदस्याला मारहाणीचा प्रयत्न, वालूथच्या उपसरपंचासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:13 IST

पुढील तपास मेढा पोलिस करीत आहेत

पाचगणी : जावळी (ता. मेढा) : वालूथ गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मासिक बैठकीदरम्यान वाद विकोपाला जाऊन एका सदस्यावर शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना बुधवारी (दि. १८) घडली आहे. याप्रकरणी संबंधित सदस्याने मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, उपसरपंचासह ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार रवींद्र सर्जेराव भिलारे (वय ४५, सध्या नवी मुंबई) येथे वास्तव्यास असून, वालूथ ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ते मसाला उद्योग व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वालूथ ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठक सुरू असताना काही सदस्यांच्या नातेवाइकांनी बैठकीत हस्तक्षेप केला. यावेळी सोमनाथ बळवंत पवार व अमरदीप अंकुश तरडे यांनी भिलारे यांच्यावर ग्रामपंचायतीच्या व सोसायटीच्या कामात घोटाळा केल्याचा आरोप करत शिवीगाळ व दमदाटी केली.

वाद वाढताच संबंधितांनी भिलारे यांच्या अंगावर धाव घेऊन मारहाणीचा प्रयत्न केला. सोमनाथ पवार यांनी हातातील पाण्याची बाटली त्यांच्या अंगावर फेकल्याचेही तक्रारीत नमूद आहे, तसेच उपसरपंच समाधान जगन्नाथ पोफळे यांनी ‘बाहेर ये, तुला दाखवतो’ अशी धमकी देत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेदरम्यान भिलारे हे मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असताना सुप्रिया पवार यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला व तो फोडण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, विजय कांबळे यांनी हस्तक्षेप करून मोबाइल परत मिळवून दिला. यानंतर तक्रार देण्यासाठी निघालेल्या भिलारे यांना काही महिलांनी अडवून मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

यात आशालता शेलार, सुप्रिया पवार, आरती तरडे व वर्षा पोफळे यांचा समावेश आहे. अखेर पोलिस पाटील अभिजित भोसले व होमगार्ड यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मेढा पोलिस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Gram Panchayat Member Assault Attempt, Case Filed Against Deputy Sarpanch

Web Summary : During a Gram Panchayat meeting in Satara, a member was allegedly attacked. A case has been registered against the Deputy Sarpanch and seven others for assault, threats, and property damage following a dispute.