खडीचा मारुती मंदिर रस्त्याचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:03+5:302021-03-22T04:35:03+5:30

समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती मंदिरांपैकी एक असलेल्या खडीचा मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. ...

Asphalting of stone Maruti Mandir road | खडीचा मारुती मंदिर रस्त्याचे डांबरीकरण

खडीचा मारुती मंदिर रस्त्याचे डांबरीकरण

समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती मंदिरांपैकी एक असलेल्या खडीचा मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. श्रावण महिन्यात ११ मारुती दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक भाविकांची संख्या मोठी असते. रस्ता नादुरुस्त असल्याने भाविकांना पायी चालत मारुतीचे दर्शन घ्यावे लागत होते. वर्षानुवर्ष दुरवस्थेच्या गर्तेत अडकून पडलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था होऊन बसली होती. शिंगणवाडीचे नवनिर्वाचित सरपंच शंकर पवार यांनी माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांच्याकडे निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. राजेश पवार यांनी तातडीने या रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. सध्या या रस्त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. रस्त्याची परवड संपल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहेत.

फोटो : २१केआरडी०२

कॅप्शन : शिंगणवाडी, ता. पाटण येथे खडीचा मारुती मंदिर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.

Web Title: Asphalting of stone Maruti Mandir road