अॅपेरिक्षा-दुचाकी समोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:39+5:302021-06-29T04:26:39+5:30

मलकापूर : घरापासून काही अंतरावर दळण ठेवून परतत असताना दुचाकीला अॅपेरिक्षाची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरात होती की ...

Aperixa-bike collided head-on; One killed | अॅपेरिक्षा-दुचाकी समोरासमोर धडक; एक ठार

अॅपेरिक्षा-दुचाकी समोरासमोर धडक; एक ठार

मलकापूर : घरापासून काही अंतरावर दळण ठेवून परतत असताना दुचाकीला अॅपेरिक्षाची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरात होती की दुचाकीसह रिक्षा नाल्यात पलटी झाली. या अपघातात दुचाकीवरील इसम ठार झाला, तर रिक्षाचालकासह तिघे जखमी झाले आहेत. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर टाकेवस्तीनजीक रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

जगनाथ आण्णा पवार (वय ६५, रा. चचेगाव, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

चचेगाव, ता. कऱ्हाड येथील जगन्नाथ पवार यांचे घोरपडे वस्तीनजीक घर आहे. ते रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच ५० जी ८२१२) टाकेवस्ती येथील गिरणीत दळण ठेवण्यासाठी गेले होते. दळण ठेवून परतत असताना घरापासून काही अंतरावरच विंग येथे निघालेल्या अॅपेरिक्षा (एमएच ११ एजी ००८१) ची दुचाकीला समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरात होती की दुचाकीसह रिक्षा रस्त्याकडेच्या नाल्यात पलटी झाले. या अपघातात पवार हे गंभीर जखमी झाले होते. तर रिक्षाचालकासह तिघे किरकोळ जखमी झाले होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पवार यांच्यासह जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

===Photopath===

280621\img_20210627_204933.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

टाकेवस्ती चचेगाव ता. कराड येथे रविवारी रात्री समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने नाल्यात पलटी झाली होती. ( छाया- माणिक डोंगरे)

Web Title: Aperixa-bike collided head-on; One killed