आंचल दलाल यांची अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

By दत्ता यादव | Published: October 3, 2023 09:34 PM2023-10-03T21:34:37+5:302023-10-03T21:35:30+5:30

दलाल यांना दुसऱ्यांदा साताऱ्यात काम करण्याची संधी मिळाली आहे.

anchal dalal appointed as additional superintendent of police | आंचल दलाल यांची अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

आंचल दलाल यांची अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

googlenewsNext

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आंचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे. दलाल यांना दुसऱ्यांदा साताऱ्यात काम करण्याची संधी मिळाली आहे.

आंचल दलाल या साताऱ्यात सहायक पोलिस अधीक्षक म्हणून पूर्वी कार्यरत होत्या. वर्षभरापूर्वी त्यांची सांगली येथे बदली झाली होती. आता पुन्हा त्या साताऱ्यात येत असून, अपर पोलिस अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. साताऱ्यात असताना त्यांनी जुगाऱ्यांवर धडक कारवाया केल्या होत्या. तसेच महाविद्यालय परिसरात होणारे छेडछाडीचे प्रकारही त्यांनी आटोक्यात आणले होते. साताऱ्यात त्यांना कामाचा चांगला अनुभव असल्यामुळे पुन्हा एकदा त्या नव्या जोमाने धडाकेबाज कामगिरी करतील, अशी अपेक्षा सातारकरांना आहे. दलाल या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पत्नी आहेत.

Web Title: anchal dalal appointed as additional superintendent of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.