शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : समाजातील महत्त्वपूर्ण आणि तितकाच दुर्लक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांची गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : समाजातील महत्त्वपूर्ण आणि तितकाच दुर्लक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांची गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड सुरू आहे. त्यांच्या जगण्याला संविधानाने मान्यता दिलीये आता त्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळ कटिबद्ध राहील, अशी ग्वाही महामंडळच्या सदस्या अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण निर्देशीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संग्राम संस्था, क्षितीज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था आणि जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांच्या कायदेविषयक समस्या आणि उपाय या विषयावर अ‍ॅड. मुजावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव होते. यावेळी संग्रामचे प्रकल्प अधिकारी शशिकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जैन सोशल ग्रुपच्या गीता मामणिया, अ‍ॅड. मनीषा बर्गे, अ‍ॅड. माधुरी प्रभूणे, अ‍ॅड. सुचित्रा काटकर, प्रा. जीवन बोराटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना प्रशांत वारकर म्हणाले, ‘प्रत्येक जाती धर्माचे आणि प्रांताचे लोक तृतीयपंथीय म्हणून आमच्या समाजात येतात, त्यामुळे आम्ही सगळे खरे भारतीय आहोत. तृतीयंपथीयांच्या नावाने कमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या समाजात असणारी गुरू चेला ही पद्धत बंद होणं आवश्यक आहे. ज्येष्ठ तृतीयपंथीयांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा.’

अध्यक्षीय मनोगतात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव म्हणाले, ‘कुठल्या चांगल्या कार्यक्रमात ज्यांचे आशीर्वाद लागतात, त्यांना समाजात अजूनही मान्यता मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्त्री-पुरुष यांच्यासारखंच तृतीयपंथी हा सुद्धा समाजाचा घटक आहे हे कायद्याला मान्य आहे. पण, या सर्वांसाठी न्याय व्यवस्था खंबीरपणे कार्यरत आहे.

या कार्यक्रमास प्रा. संध्या चौगुले, अ‍ॅड. शुभांगी दळवी यांच्यासह मान्यवर आणि तृतीयपंथी उपस्थित होते.

चौकट :

हाताला काम, राहायला घर यासाठी प्रयत्नशील

तृतीयपंथी म्हणून कोणीही जन्माला येत नाही. वयात येताना होणारे बदल लक्षात घेतल्यानंतर तृतीयपंथी असल्याचं कोणी सांगितलं तर कुटुंबीय आक्रमक होतात. अनेकांना तर घरातूनही बाहेर काढलं जातं. या सगळ्यांसाठी राहायला घर आणि हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन यावेळी उपस्थित संस्था प्रतिनिधींनी दिले.