शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गळतीच्या पाण्याचा शिवतीर्थाला वळसा

By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST

पालिकेचे दुर्लक्ष : परिसरात दुर्गंधी; पादचाऱ्यांसह वाहनधारकांची डोकेदुखी वाढली

सातारा : सातारकरांचे मानाचे पान असणाऱ्या पोवई नाक्यावरील शिवतीर्थाच्या परिसराला गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त गळतीच्या पाण्याचा वळसा पडताना पाहायला मिळतो आहे. पालिकेने आयडीबीआय बँकेसमोर बांधलेल्या बहुचर्चित दुभाजकाला ओलांडून हे पाणी शिवतीर्थाकडे जाऊन दुर्गंधी पसरली असली तरी पालिका अद्यापही गांधारीच्या भूमिकेत आहे. रयत शिक्षण संस्थेपासून पोवई नाक्याकडे जात असताना शाहूनगरला जाणाऱ्या फाट्याजवळच रस्त्याच्या मध्यभागी उपळा लागल्याप्रमाणे पाणी वर येत आहे. तिथून उताराने ते मरिआई कॉम्प्लेक्सच्या समोरून शिवतीर्थाकडे वाहत जाते. रस्त्याकडेची पार्किंगची जागा, रिक्षा स्टॉप या परिसरातील सखल भागात हे पाणी साठून राहत आहे. शिवतीर्थाला वळसा घालून हे पाणी सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरली असून, व्यावसायिकांना नाकाला रुमाल लावूनच व्यवसायाच्या ठिकाणी बसावे लागत आहे. तसेच रस्त्यावरून जाणारे पादचारीही त्रस्त झाले आहेत. शिवतीर्थ हे सातारकरांसाठी पूजनीय आहे. पण याच पूजनीय ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी जात असताना पालिकेने डोळे मिटून घेतले आहेत. येथीलच एका हॉटेलातील ड्रेनेजच्या पाईपलाईनला गळती लागल्याचे नागरिकांची तक्रार आहे; परंतु पालिकेने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार सुरु असतानाही पालिका हातावर हात धरुन बसली आहे. एसटीने साताऱ्यातील पोवईनाक्यावरुन जाणाऱ्या परजिल्ह्यातील नागरिकांकडूनही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहतूक शाखेचे पोलीसही याच घाण पाण्यात उभे राहून आपली सेवा बजावत आहेत. (प्रतिनिधी)घोटाभर पाण्यातून लोकांची वारी!पावसाळ्यात ज्याप्रमाणे पोवई नाक्यावरून पाण्याचे लोट वाहत असतात, त्याचप्रमाणे सध्या हे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे घोटाभर पाण्यातून नागरिकांना जावे लागते. परंतु हे पाणी बाधक ठरून लोकांना त्वचाविकाराला सामोरे लाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पाणी वाहत आहे. लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत असले तरी पालिकेने कारवाई केलेली नाही. शिवतीर्थावर हे दुर्गंधीयुक्त पाणी जात असल्याने लोक संतप्त झाले आहेत.- संतोष जांभळे