भाजपच्या धास्तीने मित्रपक्ष सावध; सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची गणिते जुळवण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:10 IST2026-02-14T17:10:20+5:302026-02-14T17:10:53+5:30

शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या गटनोंदणीसाठी हालचाली

Allies cautious due to fear of BJP; Attempts to reconcile calculations for forming government in Satara Zilla Parishad | भाजपच्या धास्तीने मित्रपक्ष सावध; सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची गणिते जुळवण्याचा प्रयत्न 

संग्रहित छाया

सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेची गणिते जुळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होऊ लागला आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेने सावध भुमीका घेत गट नोंदणीची प्रक्रियाही सुरू केली. शिंदेसेनेने शुक्रवारच्या बैठकीनंतर त्वरित सदस्यांच्या स्वाक्षरी घेत गटनोंदणी केली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला २७, शिवसेनेला १५ तर राष्ट्रवादी पक्षाला २० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेकडून भाजपाला दूर ठेवून सत्ता स्थापनेचे मनसुबे आखले जात आहेत. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. नुकतीच भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबइत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांनी जिल्हा परिषद निकाल व सद्यस्थिती मांडली आहे.

संख्येने मोठा असलेल्या भाजपला फक्त सहा सदस्यांची गरज आहे. दोन अपक्ष व अन्य चार यांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपाचे धुरंधर राजकीय कौशल्य पणाला लावणार यात शंका नाही. भाजपाच्या रणनीतीचा अंदाज असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी वेळ न दवडता कायदेशीर बाबींची पूर्तता सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराच्या निमित्ताने गटनेता आणि गट नोंदणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. व्हीप जारी करण्याच्या अनुषंगाने या हालचाली असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी सदस्यांच्या गटनोंदणीसाठी सह्या घेतल्या असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करण्यात येणार आहे. शिंदेसेनेने शुक्रवारीच गटनोंदणी करून घेतली आहे. दरम्यान, भाजपाच्या सदस्यांचा शनिवारी सत्कार होणार असून या पक्षाकडूनही सोमवारी गटनोंदणी होऊ शकते.

सॉफ्ट टार्गेटवर नजर

जिल्हा परिषदेत आवश्यक संख्याबळ जमण्यासाठी कोणते सदस्य भाजपाला साथ देऊ शकतात, त्यांचा अंदाज घेतला आहे. अशा सॉफ्ट टार्गेटवर लक्ष असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

Web Title : भाजपा के प्रभाव में सतारा जिला परिषद में गठबंधनों में बदलाव।

Web Summary : सतारा जिला परिषद में चुनाव के बाद गठबंधन के प्रयास जारी हैं। एनसीपी और शिंदे सेना ने भाजपा की नियंत्रण हासिल करने की रणनीति के डर से सतर्कता से समूहों को पंजीकृत किया। भाजपा बहुमत तक पहुंचने के लिए समर्थन पर नजर रख रही है।

Web Title : Alliances shift in Satara Zilla Parishad amid BJP's influence.

Web Summary : Satara Zilla Parishad sees post-election alliance efforts. NCP and Shinde Sena register groups cautiously, fearing BJP's strategy to gain control. BJP eyes support to reach majority.