शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदनंतर खंडाळ्याला नगरपंचायतीचे वेध

By admin | Updated: November 27, 2015 00:13 IST

तालुक्याचे ठिकाण : औद्योगिकीकरणामुळे शहराचे विस्तारीकरण; मात्र विकासाला अडथळे

खंडाळा : खंडाळा शहराचा आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. तर तालुक्यात औद्योगिकीकरण वाढत असताना शहराचे विस्तारीकरण होवू लागले असलेतरी विकासाला अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून खंडाळा शहरात नेहमीच गजबज दिसून येते. खंडाळ्याला ऐतिहासिक आणि राजकीय वारसा तर आहेच; पण त्याचबरोबर खंबाटकीचा विलोभनीय सहवास आणि शिवकालीन घटनांचा स्पर्श, यामुळे खंडाळ्याचे वेगळे महत्त्व आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून दिवसेंदिवस खंडाळ्याचा विस्तार वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे आमूलाग्र घडलेला बदल, कामगारांची वाढलेली संख्या, यामुळे लोकसंख्येत आपोपच वाढ झाली आहे. खंडाळ्याची ग्रामपंचायत संपूर्ण शहराचा प्रशासकीय कारभार यशस्वीपणे सांभाळत आहे. मात्र शहराच्या विकासासाठी आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. राज्यातील तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतलेला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. युती शासन नव्याने सत्तेवर आल्यापासून लोणंद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केल्याची घोषणा करण्यात आली. त्यावर प्रशासकीय अंमलही सुरू झाला आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण म्हणून खंडाळ्याची घोषणा होणे लोकांना अपेक्षित आहे. राज्य पातळीवर याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू असल्याने खंडाळ्यातील जनतेच्या नजरा नगरपंचायतीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. त्यामुळे शहराचा साचेबद्ध विकास करणे शक्य होणार आहे. पुणे शहरापासून काही अंतरावरच असल्याने पुण्याचे नागरिक शिरवळ, खंडाळ्याकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. या लोकांना सर्व सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) गावातल्या इच्छुकांची आतापासूनच तयारी..खंडाळ्यात गेल्या पाच वर्षांत लोकांच्या राहण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. औद्योगिकीकरणाने कामगार विसावलेले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अपार्टमेंट सिस्टीम वाढवलेली आहे. साहजिकच शहराचेच विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. नगरपंचायत झाल्यास सर्वच भागाचा समतोल विकास करणे सहज, सोपे जाणार आहे. यासाठी राजकीय पदाधिकारीही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायतीवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही, अशांनी नगरपंचायतीसाठी आत्ताच तयारीला सुरुवात केली आहे.