शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

अडला नारायण धरी सचिवाचे पाय!

By admin | Updated: December 4, 2014 23:46 IST

विकास सोसायटी : शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनाही माहीत नसते धोरणांची माहिती !

संजय कदम - वाठार स्टेशन -ग्रामीण अर्थव्यवस्थेची आधारवाहिनी असलेल्या विकास सेवा सोसयटीमध्ये प्रत्येकाचीच भूमिका महत्त्वाची असते. असे असतानाही सोसायटीच्या सचिवाचा मान मात्र, निराळाच असतो. यामुळे अडला-नडला शेतकरी सततच सचिवाच्या संपर्कात येतो. आणि सोसायटीच्या कर्जाची वाट पाहतो.
शेतकऱ्याप्रमाणेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ५ वर्षासाठी या संस्थेत प्रतिष्ठेने उठ-बस करतात. परंतु, संस्थेच्या ध्येय धोरणांची माहिती त्यांनाही नसते. अगदी याचा फायदा घेवून देऊर-दहिगाव सारख्या सोसायटीत ३ कोटी पर्यंतची अफरातफर होते. खरेतर यात केवळ सचिव हाच सूत्रधार नाही तर इतर अनेक चेहरे उजेडात येण्याची गरज आहे.
सोसायटी सचिवांनी कर्जमागणी सभासदांची कर्जप्रकरणे ही जिल्हा बँकेच्या धोरणाप्रमाणे ही प्रकरणे , ७/१२ खाते उतारे तपासून तसेच या सभासदाची खातरजमा करणे गरजेचे असते. तसेच या कर्ज मागण्याऱ्या सभासदास कमाल मर्यादा (कम) प्रमाणे कर्ज देण्याची गरज असते. या गोष्टीबाबत देऊर-दहिगाव विकास सेवा सोसायटीत या नियमांचे पालन झाले का? हे पहाणे गरजेचे आहे. त्यामुळे या बँकेच्या विकास अधिकाऱ्यांनी येथील ५५ लाखांच्या दुबार प्रकरणाला संमती कशी देण्यात आली हे शोधणे गरजेचे आहे.
सोसायटीत निवडून आलेल्या संचालक मंडळाची जबाबदारी तरी सचिवाच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची असली तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकवर्षी या सहकारी संस्थेचे आॅडीट तपासणाऱ्या लेखा परिक्षकांनी ५ वर्षात या संस्थांत नक्की कश्याच्या तपासण्या केल्या. जर या लेखा परिक्षकांनी सोसायटीचे लेखापरिक्षण करताना अफरातफरीबाबतच्या सूचना वेळोवेळी दिल्या असल्या तर ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. या प्रकरणात लेखापरिक्षकांच्या तपासणी कामाबाबतही संशय निर्माण होत आहे.


दोषी सर्वांवरच कारवाई व्हावी...
देऊर-दहिगाव सोसयटी अपहारात सचिव हे मुख्य दोषी दाखवण्यात आले असलेतरी सचिवावर नियंत्रण ठेवणाऱ्या लेखापरिक्षक, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी यांना या प्रकरणातून वाचवण्याचाच प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अपहार प्रकरणात जे दोषी त्या सर्वांवरच कारवाई व्हावी, ही भूमिका घेणे गरजेचे आहे.