शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पैसे उकळण्यासाठी माझ्याविरोधात कारवाई

By admin | Updated: July 22, 2014 22:49 IST

कंग्राळकर : गालफाडे, मोरे यांच्यावर गंभीर आरोप

सातारा : अवैध उत्खनन प्रकरणात कारवाईच्या जाळ्यात अडकलेले बांधकाम व्यावसायीक श्रीधर कंग्राळकर यांनी तहसीलदारांच्या कारवाईविरोधात थेट प्रांताधिकाऱ्यांकडे दावा ठोकला आहे. पैसे उकळण्यासाठी काही लोकांच्या दबावामुळे तहसीलदारांनी कारवाई केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी वकीलांच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीत तहसीलदारांसह किशोर गालफाडे व सुशांत मोरे यांच्याविरोधात केला आहे.शहरात राधिका रस्त्यावरील जागेत अनधिकृतरीत्या उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिक श्रीधर आनंदराव कंग्राळकर यांना २२ लाख ९५ हजार ७०० रुपये दंडाची नोटीस धाडली होती. कंग्राळकर यांनी राधिका रस्त्यावरील सि.स.नं.२८३/१अ प्लॉट नं. १ मध्ये उत्खनन केले आहे. मंडलाधिकाऱ्यांमार्फत केलेल्या पंचनाम्यावरुन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी कंग्राळकर यांना दंडाची नोटीस बजावली होती. या नोटीसीची मुदत बुधवारी (दि. २३) संपत आहे.संबंधित जागेवर खोदकाम करण्याआधी प्रांताधिकाऱ्यांकडे रॉयल्टीची रक्कम भरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर त्यांनी केवळ १ हजार ब्रासची रॉयल्टी भरुन तब्बल ३ हजार ८७ ब्रासचे उत्खनन केल्याचे मंडलाधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यावरुन समोर आले आहे. मात्र, या पंचनाम्याची नोटीस मिळाली नाही. हा पंचनामा एकतर्फी करण्यात आला. या पंचनाम्यातील मोजमापे ही ढोबळ मानाने लिहिलेली असून ती पूर्णत: चुकीची आहेत. तसेच तहसीलदारांनी दिलेली नोटीसही बेकायदा आहे, असे कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेत कंग्राळकर यांनी इमारतीच्या पायाभरणीसाठी केलेल्या खोदकामासाठी रॉयल्टी द्यावी लागत नाही, अशी या तक्रारीत नोंद केलेली आहे. (प्रतिनिधी)