दरोड्यातील आरोपीला थरारक पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:56 AM2020-01-07T11:56:46+5:302020-01-07T11:58:04+5:30

जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून सोमवारी दुपारी सुरवडी, ता. फलटण येथे पकडले.

Accused of robbery chased after the thugs | दरोड्यातील आरोपीला थरारक पाठलाग करून पकडले

दरोड्यातील आरोपीला थरारक पाठलाग करून पकडले

Next
ठळक मुद्देदरोड्यातील आरोपीला थरारक पाठलाग करून पकडलेस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बारामतीमध्येही गुन्हे दाखल

सातारा : जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून सोमवारी दुपारी सुरवडी, ता. फलटण येथे पकडले.

सागर उर्फ चिंग्या उर्फ चिंगम शिवा काळे (वय २५, रा. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या दरोड्यातील आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील सोनगाव येथे ११ जुलै २०१९ रोजी रात्री दीडच्या सुमारास कोयत्याचा धाक दाखवून एका घरात सागर काळेने जबरी चोरी केली होती.

यावेळी त्याने घरातील एका महिलेला दांडक्याने मारहाण करत गळ्यातील मंगळसूत्रसह सुमारे २३ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. जबरी चोरीप्रकरणी संशयितावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या जबरी चोरीमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, सुरवडी, ता. फलटण येथील कमिन्स कंपनीच्या पाठीमागे तो आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी टीम तेथे तत्काळ रवाना झाली.

पोलीस आल्याचे पाहून सागर काळेने धूूम ठोकली. परंतु पोलिसांनी एक किलो मीटर अंतर थरारक पाठलाग करत अखेर त्याला पकडले. पोलीस ठाण्यात त्याला आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. लोणंद, फलटण शहर, फलटण ग्रामीण, बारामती, वडगाव निंबाळकर आदी ठिकाणी घरफोडी, चोरी, जबरी चोरीचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे पुढे आले. अधिक तपासासाठी त्याला सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, मोहन नाचन, संतोष जाधव, प्रवीण कडव, योगेश पोळ आदींनी या कारवाईत भाग घेतला.
 

Web Title: Accused of robbery chased after the thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.