तीन महिने फरार आरोपी पुसेगाव पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:37 IST2021-05-16T04:37:57+5:302021-05-16T04:37:57+5:30

पुसेगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या फरार झालेल्या नराधमास पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले. रोहन सूर्यकांत ...

Accused absconding for three months in Pusegaon police net | तीन महिने फरार आरोपी पुसेगाव पोलिसांच्या जाळ्यात

तीन महिने फरार आरोपी पुसेगाव पोलिसांच्या जाळ्यात

पुसेगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या फरार झालेल्या नराधमास पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले. रोहन सूर्यकांत मसणे असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी रोहन याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पुसेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र तेव्हापासून फरार असलेला रोहन मसणे पुसेगावात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांना मिळली. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मछले यांनी शोध पथक तयार करून सापळा लावला. पोलिसांचा संशय आल्याने रोहन याने कोरेगाव बाजूस दुचाकीवरून पलायन केले. पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सहायक फोजदार जगताप,

कर्मचारी सचिन माने, के. के. कुंभार, पुष्कर जाधव, सचिन जगताप, इम्तियाज मुल्ला, हणमंत सुतार, हेमंत शिंदे, सागर गायकवाड यांनी रोहन याचा पाठलाग करून क्षेत्रमाहुली येथे ताब्यात घेतले. तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करत आहेत.

१५पुसेगाव

Web Title: Accused absconding for three months in Pusegaon police net