Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:16 IST2026-02-10T19:15:39+5:302026-02-10T19:16:44+5:30

मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न

Accident at Khed Phata on Pune-Bengaluru National Highway Young man's body mutilated after vehicle runs over him | Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न

Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न

सातारा: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील खेड फाट्यावर सोमवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. एका ३५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्याच्या अंगावरून शेकडो वाहने गेली. यामुळे त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला. मृत तरुणाची ओळख पटली नसून पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

बाॅम्बे रेस्टाॅरंट ते वाढे फाट्याकडे जाणाऱ्या महामार्गावर एका तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचे सातारा शहर पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. संबंधित तरुणाच्या अंगावरून शेकडो वाहने गेल्याने त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. पोलिसांनी अक्षरश: शरीराचे तुकडे वेचून पोत्यात भरले. 

घटनास्थळाचे चित्र विदारक होते. त्या तरुणाच्या अंगात निळसर जीन्स पॅन्ट व राखाडी शर्ट आहे. त्याच्या खिशात पोलिसांना काहीच सापडले नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविणे अत्यंत मुश्कील असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार महांगडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : सतारा: हाईवे पर भीषण हादसा, वाहनों से क्षत-विक्षत हुआ शव

Web Summary : सतारा के पास एक भीषण दुर्घटना में 35 वर्षीय व्यक्ति की मौत हो गई। एक अज्ञात वाहन ने उसे टक्कर मार दी, और बाद में कई वाहन उसके शरीर पर चढ़ गए, जिससे वह क्षत-विक्षत हो गया। पुलिस पीड़ित की पहचान करने की कोशिश कर रही है, जिसके कपड़ों में जींस और एक ग्रे शर्ट शामिल थी।

Web Title : Satara: Horrific Accident on Highway, Body Dismembered by Vehicles

Web Summary : A 35-year-old man was killed in a gruesome accident near Satara. An unidentified vehicle hit him, and subsequently, numerous vehicles ran over his body, leaving it dismembered. Police are trying to identify the victim, whose clothing included jeans and a grey shirt.